मेळघाटात पुनर्वसनासाठी हजार कोटींची गरज!
By admin | Published: November 24, 2015 02:53 AM2015-11-24T02:53:01+5:302015-11-24T02:53:01+5:30
मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत २२ गावांच्या पुनर्वसनासाठी सुमारे एक हजार कोटींची गरज आहे. गेल्या सात वर्षांपासून निधीच उपलब्ध होत नसल्यामुळे अतिसंरक्षित गावांचे पुनर्वसन कसे करावे
गणेश वासनिक, अमरावती
मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत २२ गावांच्या पुनर्वसनासाठी सुमारे एक हजार कोटींची गरज आहे. गेल्या सात वर्षांपासून निधीच उपलब्ध होत नसल्यामुळे अतिसंरक्षित गावांचे पुनर्वसन कसे करावे, हा प्रश्न व्याघ्र प्रकल्पातील अधिकाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पात बफर आणि कोअर झोनमध्ये एकूण ११३ गावे आहेत. कोअर झोनमधील ३७ गावांपैकी आतापर्यंत १४ गावांचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र उर्वरित २३ गावांचे पुनर्वसन अद्याप झालेले नाही. त्यातील २२ गावांच्या पुनर्वसनासाठी ४०० कोटींची आवश्यकता असल्याचा प्रस्ताव सात वर्षांपूर्वी राज्य शासनाकडे पाठविला होता.
यापूर्वी १४ गावांच्या पुनर्वसनासाठी १५ वर्षांचा कालावधी लागला. निधी वेळेत मिळत नसल्याने गावांच्या पुनर्वसनाचे नियोजन करता आले नाही. वारंवार पाठपुरावा करूनही शासन निधी उपलब्ध करुन देत नाही.
- दिनेशकुमार त्यागी, क्षेत्र संचालक, मेळघाट