हजार फूट खोल दरीत पडलेल्या चौघांना वाचविले

By admin | Published: December 29, 2015 12:44 PM2015-12-29T12:44:09+5:302015-12-29T12:51:11+5:30

पोलादपूर-महाबळेश्‍वर मार्गावर कार चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातानंतर महाबळेश्‍वर येथील धाडसी हायकर्सच्या तरुणांनी रात्रंदिवस शोधमोहिमेनंतर २४ तासांनंतर चार जणांना दरीबाहेर काढले.

Thousands of feet were saved by the four drops falling in the valley | हजार फूट खोल दरीत पडलेल्या चौघांना वाचविले

हजार फूट खोल दरीत पडलेल्या चौघांना वाचविले

Next

 

 

 

पोलादपूर-महाबळेश्‍वर मार्गावर कार अपघात : २४ तासांनंतर हायकर्सच्या मदतीने काढले बाहेर
महाड : पोलादपूर-महाबळेश्‍वर मार्गावरील घाटात भरधाव कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला सुमारे एक हजार फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात कारमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी पहाटे ३ वा. पोलादपूरपासून १५ कि.मी. अंतरावर दाभोळ गावच्या हद्दीत ही दुर्घटना घडली. अपघातग्रस्त कुटुंब हे मूळचे कर्नाटक राज्यातील बेंगलोरचे रहिवासी असून, ते पर्यटनासाठी आले होते. मुंबईहून महाबळेश्‍वरकडे जात असताना त्यांची कार दरीत कोसळली. महाबळेश्‍वर येथील धाडसी हायकर्सच्या तरुणांनी रात्रंदिवस शोधमोहिमेनंतर २४ तासांनंतर दोन मृतदेह आणि चार जणांना दरीबाहेर काढण्यात यश मिळवले. 
खन्नाबेरम वेणुगोपालस्वामी (७0) आणि जमुना खन्नाबेरम असे या दुर्घटनेत मरण पावलेल्या दाम्पत्याचे नाव असून, अरविंद खन्नाबेरम (३५), सुनील महेंद्र (३२) चालक, अनुपमा खन्नाबेरम (३२) व अर्पिता विजय (१४, सर्व रा. यशवंतपुरम् मेट्रो स्टेशन, बेंगलोर) हे चौघे जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. जखमींवर महाडच्या डॉ. रानडे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
चार दिवसांपूर्वी बेंगलोरहून निघालेले हे कुटुंब दोन दिवस मुंबईत होते. त्यानंतर महाबळेश्‍वरला जाण्यासाठी ते निघाले. वाटेत महाडला थांबण्याचा त्यांचा बेत होता. मात्र, लॉज फुल्ल असल्याने त्यांनी शनिवारी रात्रीच महाबळेश्‍वरला जाण्याचा निर्णय घेतला. मात्र वाटेत त्यांच्यावर काळाने झडप घातली. ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली तेथे कडाक्याची थंडी, गर्द झाडी व काळोख असल्याने काय करावे तेच त्यांना समजत नव्हते. अरविंद यांनी मोबाइलवरून बेंगलोरच्या एका मित्राला कार महाबळेश्‍वरजवळ घाटात दरीत कोसळली असल्याचा मेसेज पाठवला. रविवारी सकाळी हा मेसेज मिळाल्यानंतर त्यांनी महाबळेश्‍वर पोलिसांशी संपर्क साधला. महाबळेश्‍वर पोलिसांनी हायकर्सच्या मदतीने महाबळेश्‍वर मार्गावरील सर्व घाटांमध्ये शोधमोहीम सुरू केली. मात्र नेमकी दुर्घटना कुठे घडली, त्या ठिकाणचा तपास दिवसभर लागू शकला नाही. पोलादपूर पोलिसांनीही सर्व मार्गांवरील घाटामध्ये शोधमोहीम सुरू ठेवली. रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी हरगुडे हे जीपने महाबळेश्‍वर मार्गाने शोधकामासाठी जात असताना गाडीच्या सायरनचा आवाज अपघातग्रस्तांना आला. त्याचवेळी अपघातस्थळाच्या जवळपास शोधमोहीम करणार्‍या महाबळेश्‍वर येथील हायकर्सच्या तरुणांची गाडी त्यांना भेटली. त्या आवाजांचा वेध घेत त्या ठिकाणी हायकर्सचे तरुण दरीत उतरले व त्यांनी अपघातग्रस्तांना शोधून काढले. आज सोमवारी सकाळी ६ वाजता दोन मृतांसह चार जखमींना बाहेर काढण्यात हायकर्स व पोलिसांना अखेर यश आले. या दाम्पत्याचे मृतदेह पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. 
महाबळेश्‍वर येथील अनिल केळगणे, अनिल शिंदे, नीलेश बावळेकर, ओम्कार, सविनकर, सुनील मझिया, नीलेश आडे, संदीप जांभळे, निशांत शिंदे, जयवंत तिरमळे, अनिकेत नाकदरे, कृष्णा बावळेकर या धाडसी तरुणांनी २४ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही शोधमोहीम यशस्वी केली.

Web Title: Thousands of feet were saved by the four drops falling in the valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.