विसर्जन मिरवणुकीत हजारांवर हँडसेट लंपास : १६ चोरट्यांकडून शंभरहून अधिक मोबाईल हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 08:22 PM2018-09-24T20:22:31+5:302018-09-24T20:36:41+5:30

गणेश विसर्जन मिरवणुकीत गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरीच्या एक हजाराहून अधिक घटना घडल्या. या चोऱ्या प्रामुख्याने लक्ष्मी रोडवर बेलबाग चौक ते विजय टॉकीज चौक दरम्यान करण्यात आल्या.

thousands mobile phones theft in ganesh immersion procession : 100 mobile phones seized by 16 thieves | विसर्जन मिरवणुकीत हजारांवर हँडसेट लंपास : १६ चोरट्यांकडून शंभरहून अधिक मोबाईल हस्तगत

विसर्जन मिरवणुकीत हजारांवर हँडसेट लंपास : १६ चोरट्यांकडून शंभरहून अधिक मोबाईल हस्तगत

googlenewsNext
ठळक मुद्देमालेगावातील टोळीकडून ७५ मोबाईल जप्तचार प्रमुख मार्गांवर मोबाईल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष पथकेविसर्जन मिरवणुकीत अल्पवयीन मुलांचा मोबाईल चोरीसाठी वापर आतापर्यंत एकूण ९ जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीत गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरीच्या एक हजाराहून अधिक घटना घडल्या असून गुन्हे शाखेच्या युनिट दोनने मोबाईल चोरीसाठी खास मालेगावहून दोन गाड्या करुन आलेल्या टोळीतील ९ जणांना ताब्यात घेतले आहे़. त्यांच्याकडून आतापर्यंत ७५ हँडसेट हस्तगत केले आहे़. डेक्कन पोलिसांनी तिघांना अटक करुन त्यांच्याकडून २७ मोबाईल जप्त केले आहेत़. याशिवाय विश्रामबाग, फरासखाना पोलिसांनी प्रत्येकी दोघांना ताब्यात घेतले आहे़. 
विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रोड, टिळक रोड, कुमठेकर रोड, केळकर रोड या चार प्रमुख मार्गांवर मोबाईल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके ठेवली होती़. तसेच साध्या वेशातील पोलिसांची गस्तही सुरु होती़. 
असे असताना चोरट्यांच्या टोळ्यांनी मोठ्या प्रमाणावर मोबाईल लंपास केले़. या चोऱ्या प्रामुख्याने लक्ष्मी रोडवर बेलबाग चौक ते विजय टॉकीज चौक दरम्यान घडल्या़ तसेच बेलबाग चौक ते मंडई दरम्यानही मोबाईल, पाकीट लांबविण्याच्या घटना अधिक होत्या़. 
गुन्हे शाखेच्या युनिट २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी दगडूशेठ गणपती व हुजुरपागा येथे मालेगावहून आलेल्या चोरट्यांना पकडले़ हे पथक गस्त घालत असताना त्यांनी दोघा जणांना मोबाईल चोरताना पकडले़. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीतून वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या त्यांच्या साथीदारांना ताब्यात घेण्यात आले़. आतापर्यंत एकूण ९ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून ७५ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे़. त्यांच्या आणखी साथीदारांना पकडण्यासाठी एक पथक रवाना झाले आहे़. 
डेक्कन पोलिसांनी मोबाईल चोरणाऱ्या तिघांना अटक करुन त्यांच्याकडून २७ मोबाईल जप्त केले आहेत़. सुरज सुभाष कोल (वय २३, रा़ शहाजपूर, मध्य प्रदेश), चपाटी शाम दीपक (वय १९, रा़ बबीना, झाशी, उत्तर प्रदेश) आणि अरुण प्रकाश कोल (वय २१, रा़ शहाजपूर, मध्य प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़. 
डेक्कन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस़ के़ सोनावणे व त्यांच्या सहकाऱ्यांना झेड ब्रीजजवळ मोबाईल चोरटे थांबले असल्याची माहिती मिळाली़. त्यावरुन त्यांनी तिघांना ताब्यात घेतले़ त्यांच्याकडून २७ मोबाईल जप्त केले आहेत़. याशिवाय फरासखाना व विश्रामबाग पोलिसांनी दोन दोन चोरट्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे तपास करण्यात येत आहे़. 
................
अल्पवयीन मुलांचा वापर
विसर्जन मिरवणुकीत अल्पवयीन मुलांचा मोबाईल चोरीसाठी वापर करण्यात आल्याचे दिसून आले़. मुख्य मिरवणूक मार्गावर मोठ्या प्रमाणावर मोबाईल चोरीला गेले़. सायंकाळनंतर भाऊ रंगारी, अखिल मंडई मंडळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जन मिरवणूकीत सहभागी झाले़. त्यांचे दर्शन घेण्यासाठी लक्ष्मी रोडवर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती़. त्याचा गैरफायदा घेऊन घोळक्याने चोरटे मोबाईल, पाकीटे चोरत असल्याचे आढळून आले़ .हे गणपती पुढे गेल्यानंतर विश्रामबाग, फरासखाना पोलीस ठाणे व मंडई पोलीस चौकी येथे मोबाईल चोरीला गेल्याच्या तक्रारी देण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती़. पोलिसांनी त्यांना शहर पोलीस दलाच्या वेबसाईटवर लॉस्ट अँड फाऊंड या ठिकाणी तक्रार देण्यास सांगितले़. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत आतापर्यंत किती मोबाईल चोरीला गेले याची अजून नोंद पूर्ण झाली नाही़. हजारांहून अधिक मोबाईल चोरीला गेल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली़. 

Web Title: thousands mobile phones theft in ganesh immersion procession : 100 mobile phones seized by 16 thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.