सोलापूरात हजारो हात गुंतले स्वच्छतेच्या कामात

By Admin | Published: March 1, 2017 04:03 PM2017-03-01T16:03:34+5:302017-03-01T16:03:34+5:30

सोलापूरात हजारो हात गुंतले स्वच्छतेच्या कामात

Thousands of people engage in cleanliness in Solapur | सोलापूरात हजारो हात गुंतले स्वच्छतेच्या कामात

सोलापूरात हजारो हात गुंतले स्वच्छतेच्या कामात

googlenewsNext

सोलापूरात हजारो हात गुंतले स्वच्छतेच्या कामात
सोलापूर : आॅनलाईन लोकमत
डॉ़ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा (ता़ अलिबाग, जि़ रायगड) यांच्यावतीने बुधवार १ मार्च रोजी सोलापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली़ या मोहिमेत हजारो सेवकांनी सहभाग नोंदविला होता़ सकाळपासून राबविलेल्या या स्वच्छता मोहिमेत तब्बल ८० टन कचरा गोळा करण्यात आला़ या मोहिमेचे उदघाटन मनपा आयुक्त विजयकुमार काळम-पाटील, कौटुंबिक न्यायालयाचे रूकमे, पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांच्या हस्ते करण्यात आले़ ही स्वच्छता मोहिम भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचे राज्यपालांनी नियुक्त केलेले स्वच्छता दूत डॉ़ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ़ आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली आहे़
-------------------------------------
या मार्गावरील झाली स्वच्छता
नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने शहरातील शिवाजी चौक ते रूपाभवानी मंदिर, शिवाजी चौक ते रेल्वे स्टेशन, शिवाजी चौक ते कन्ना चौक, पार्क चौक, होम मैदान, आसरा चौक, रंगभवन चौक, सात रस्ता, गुरूनानक चौक, अशोक चौक, बोरामणी नाका, दयानंद महाविद्यालय, कुंभार वेस, टिळक चौक, बाळीवेस, विजापूर वेस, दत्त चौक, शासकीय रूग्णालय, जिल्हा सरकारी न्यायालय, महावीर चौक, होटगी रोड आदी ठिकाणी ९ रूट मार्गावर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली़
--------------------------
ही होती यंत्रणा
नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत ५० घंटागाड्या, ३२ ट्रॅक्टर, ४ हजार ५०० सेवक याशिवाय हात मोजे, झाडू, मास्क, कचरा उचलण्याचे साहित्य होते़ जमा करण्यात आलेला कचरा मनपा यंत्रणेच्या माध्यमातून डंपिंग ग्राऊंडपर्यंत पोहचविण्यात आला़

Web Title: Thousands of people engage in cleanliness in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.