दोन दिवसांत हजारोंनी घेतली बौद्ध धम्माची दीक्षा
By admin | Published: October 22, 2015 01:57 AM2015-10-22T01:57:45+5:302015-10-22T01:57:45+5:30
येथील दीक्षाभूमीवर ५९व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राधामोहन सिंग यांच्या उपस्थितीत मुख्य सोहळा होणार आहे.
नागपूर : येथील दीक्षाभूमीवर ५९व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राधामोहन सिंग यांच्या उपस्थितीत मुख्य सोहळा होणार आहे. येथे गेल्या दोन दिवसांत २४ हजार लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती.
तो दिवस बौद्धधर्मीय धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा करतात. त्या निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने गुरुवारी सायंकाळी होणाऱ्या मुख्य सोहळ््यास कर्नाटकचे सामाजिक न्यायमंत्री एच. अंजय्या, नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची प्रमुख उपस्थिती असेल.
स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई
ससाई हे अध्यक्षस्थानी राहतील. बौद्ध धम्मदीक्षा समारंभास मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. समारंभाच्या पहिल्या दिवशी सात हजार लोकांनी, तर दुसऱ्या दिवशी १७ हजार लोकांनी दीक्षा घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या नेतृत्वात भिक्खू संघातर्फे बौद्ध धम्माची दीक्षा देण्यात येत आहे.
त्रिशरण, पंचशीलसह डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञासुद्धा दीक्षा देताना दिल्या जात आहे. या सोबतच अनेक लोक श्रामणेर दीक्षासुद्धा घेत आहेत. दोन दिवसांत हजारोंनी श्रामणेर दीक्षा घेतली. त्यापैकी बुधवारी ७०० लोकांनी दीक्षा घेऊन काही काळ श्रामणेर म्हणून जगण्याची दीक्षा घेतली.