पुण्यात विद्यार्थिनीवर चोरट्याचा बलात्कार
By Admin | Published: February 27, 2016 04:52 AM2016-02-27T04:52:15+5:302016-02-27T04:52:15+5:30
महाविद्यालयाच्या जिममध्ये व्यायाम केल्यानंतर हनुमान टेकडीवर जाऊन पुस्तक वाचत बसलेल्या महाविद्यालयीन तरुणीला धाक दाखवत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची खळबळजनक
पुणे : महाविद्यालयाच्या जिममध्ये व्यायाम केल्यानंतर हनुमान टेकडीवर जाऊन पुस्तक वाचत बसलेल्या महाविद्यालयीन तरुणीला धाक दाखवत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची खळबळजनक घटना बुधवारी संध्याकाळी ७च्या सुमारास घडली. बलात्कारानंतर आरोपीने तिची पर्स हिसकावून नेली. चतु:श्रुंगी पोलिसांनी गुरुवारी रात्री १२च्या सुमारास गुन्हा दाखल करून विजय विकास कांबळे (२१) या सेनापती बापट रस्तावरील वडारवाडीत राहणाऱ्या युवकाला अटक केली.
या प्रकरणी १९वर्षीय पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. ती मूळची पश्चिम बंगालची असून, जुलै २0१५पासून सेनापती बापट रस्त्यावरच्या एका प्रख्यात महाविद्यालयामध्ये बीएस्सीच्या (अर्थशास्त्र) प्रथम वर्षाला शिक्षण घेत आहे. तिचे वडील एका राष्ट्रीय बँकेत रोखपाल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी बुधवारी संध्याकाळी नेहमीप्रमाणे टेकडीवर गेली होती. पॅगोडाजवळ बसून पुस्तक वाचायला सुरुवात केली. त्या वेळी अचानक पाठीमागून आलेल्या कांबळेने तिचे तोंड दाबून धरून तिचा विनयभंग केला. त्यानंतर त्याने मराठी-हिंदीमध्ये पैसा-पैसा असे बडबडत तिची पर्स हिसकावून घेतली. पॅगोडापासून १५ फुटांपर्यंत तिला लांब नेऊन बलात्कार केला. मदतीसाठी कोणीच दिसत नव्हते. त्यामुळे त्याने पुन्हा तिला जवळच्या उतारावर नेऊन कपडे काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, कोणीतरी येत असल्याची चाहुल लागताच आरोपी कांबळे तेथून पसार झाला. पीडित मुलीने तेथे आलेल्या दोन माणसांना घडलेला प्रकार सांगितल्यावर त्यांनी आरोपीचा शोध घेतला मात्र तो मिळाला नाही. घाबरलेली तरुणी तिच्या खोलीवर गेली. मैत्रिणीच्या मोबाइलवरून तिने वडिलांना फोनवरून माहिती दिली. त्यांनी पोलिसांकडे जाऊन तक्रार देण्यास सांगितले. परंतु घाबरल्यामुळे ती पोलिसांकडे गेली नाही. गुरुवारी सकाळी चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली.
सराईत गुन्हेगार
गुरुवारी रात्री ११ वाजून ५६ मिनिटांनी पोलिसांनी गुन्हा नोंदवल्यानंतर आरोपीच्या शोधाला तत्काळ सुरुवात केली. आरोपी कांबळेवर डेक्कन पोलीस ठाण्यात हनुमान टेकडीवर फिरायला येणाऱ्यांना लुटण्याचे दोन गुन्हे दाखल आहेत. त्याला सहा महिन्यांपूर्वी गुन्हे शाखेच्या युनिट १च्या पथकाने अटक केली होती. त्याच्यावर यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती, अशी माहिती उपायुक्त
डॉ. बसवराज तेली यांनी दिली.