बलात्कार करणा-यांचे हात-पाय छाटले पाहिजेत - राज ठाकरे

By admin | Published: July 25, 2016 11:59 AM2016-07-25T11:59:47+5:302016-07-25T13:11:06+5:30

बलात्कार करणा-यांचे हात पाय छाटले पाहिजेत अशा संतप्त शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Thousands of rapists should be thrashed - Raj Thackeray | बलात्कार करणा-यांचे हात-पाय छाटले पाहिजेत - राज ठाकरे

बलात्कार करणा-यांचे हात-पाय छाटले पाहिजेत - राज ठाकरे

Next

ऑनलाइन लोकमत

अहमदनगर, दि. २५ - बलात्कार करणा-यांना शरयत सारखा कायदा लागू केला पाहिजे. बलात्कार करणा-यांचे हात पाय छाटले पाहिजेत अशा संतप्त शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 
अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यभरात संतापाचे वातावरण असून संसदेचही त्याचे पडसाद उमटले. याप्रकरणी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी विरोधकांनी केली. 
याच घटनेच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सकाळी कोपर्डी येथे जाऊन पीडित बालिकेच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी  बलात्कार करणा-यांचे हात, पाय तोडले पाहिजेत असे सांगत शरियासारखा कायदा लागू करण्याची गरज असल्याते मत व्यक्त केले. लोकांमध्ये कायद्याचा धाक उरलेला नाही, त्यामुळेच असे गुन्हे करणा-या आरोपींना कठोरात कठोर शासन केले पाहिजे, जेणेकरून परत कोणाचीही अशी कृत्य करण्याची हिंमत होणार नाही, असे ते म्हणाले. 
तसेच अॅट्रॉसिटीचा गैरवारपर होत असल्यास पर्याय पाहिजे असेही राज यांनी नमूद केले. दरम्यान, सरकार बदलले आहे याची लोकांना जाणीव झाली पाहिजे, अद्याप ती झालेली दिसत नाही अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला हाणला. कायदयाचा धाक निर्माण झाला पाहिजे असे सरकारचे काम हवे आहे, असेही राज म्हणाले.
 
 आणखी वाचा : 
(गोपनीयता बाळगत मुख्यमंत्र्यांनी दिली कोपर्डीला भेट)
(कोपर्डीतील आरोपीला ठार मारणा-यास देणार लाख रुपयांचे बक्षिस) 
 

 

Web Title: Thousands of rapists should be thrashed - Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.