सहा महिन्यांत ज्येष्ठांकडून हजार तक्रारी

By admin | Published: July 2, 2016 02:12 AM2016-07-02T02:12:52+5:302016-07-02T02:12:52+5:30

शहरात एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत चालली असून, गेल्या ६ महिन्यांत ज्येष्ठ नागरिकांनी तब्बल एक हजार तक्रारी केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Thousands of senior citizens complain in six months | सहा महिन्यांत ज्येष्ठांकडून हजार तक्रारी

सहा महिन्यांत ज्येष्ठांकडून हजार तक्रारी

Next


पुणे : शहरात एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत चालली असून, गेल्या ६ महिन्यांत ज्येष्ठ नागरिकांनी तब्बल एक हजार तक्रारी केल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्याच्या आकडेवारीनुसार साडेनऊ हजार ज्येष्ठांनी नावनोंदणी केली आहे. त्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असल्याची माहितीही पोलिसांनी दिली. दोनच दिवसांपूर्वी ज्येष्ठ दाम्पत्यावर हल्ला करून ऐवज लुटून नेल्याची घटना घडल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये ज्येष्ठांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी २००७मध्ये ‘ज्येष्ठ नागरिक सहायता कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्पलाईनही सुरू करण्यात आलेली आहे. शासनाच्या आदेशानुसार पोलिसांनी शहरातील एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी केलेली आहे. त्यांच्या समस्या सोडविण्यावर पोलिसांचा भर असतो. प्रत्येक पोलीस ठाण्यात एक अधिकारी आणि दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली असून, त्यांच्यामार्फत ज्येष्ठ नागरिकांशी संपर्क ठेवला जातो. आतापर्यंत अडीच हजार ज्येष्ठांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आलेले असून, आणखी एक हजार ओळखपत्रे वाटण्यात येणार आहेत. शहरात ज्येष्ठ नागरिकांचे १३६ नोंदणीकृत संघ आहेत. गेल्या ६ महिन्यांत ज्येष्ठ नागरिकांचे १३ मेळावे घेण्यात आले आहेत.
प्रामुख्याने मुले सांभाळत नाहीत, लाईट नाही, गॅस संपला, गोळ्याऔषधे संपली आहेत, परिसरात गोंधळ सुरू आहे, अशा अनेक तक्रारी हेल्पलाईनवर करण्यात येतात. गेल्या ६ महिन्यांत १ हजार ८४ तक्रारी ज्येष्ठांनी केल्या आहेत. अडीच हजार ज्येष्ठांना आतापर्यंत ओळखपत्र देण्यात आले आहे. तसेच, एक हजार ज्येष्ठांचे ओळखपत्र तयार करण्यात आले आहे.
पोलिसांनी शहरातील एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी केलेली आहे. त्यांच्या समस्या सोडविण्यावर पोलिसांचा भर असतो. शहरात ज्येष्ठ नागरिकांचे १३६ नोंदणीकृत संघ आहेत. गेल्या ६ महिन्यांत ज्येष्ठ नागरिकांचे १३ मेळावे घेण्यात आले आहेत. प्रामुख्याने मुले सांभाळत नाहीत, लाईट नाही, गॅस संपला, गोळ्याऔषधे संपली आहेत, परिसरात गोंधळ सुरू आहे, अशा अनेक तक्रारी हेल्पलाईनवर करण्यात येतात.

Web Title: Thousands of senior citizens complain in six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.