हजार विद्यार्थ्यांनी नाकारले प्रवेश

By admin | Published: July 9, 2014 01:04 AM2014-07-09T01:04:57+5:302014-07-09T01:04:57+5:30

केंद्रीय प्रवेश समितीद्वारे राबविण्यात येणाऱ्या अकरावी द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेचा मंगळवारी सहावा दिवस होता. आतापर्यंत द्विलक्षी अभ्यासक्रमात तीन हजारांवर अधिक प्रवेश झाले असून,

Thousands of students rejected admission | हजार विद्यार्थ्यांनी नाकारले प्रवेश

हजार विद्यार्थ्यांनी नाकारले प्रवेश

Next

अकरावी प्रवेशप्रक्रिया : द्विलक्षी अभ्यासक्रमाचे तीन हजारांवर प्रवेश
नागपूर : केंद्रीय प्रवेश समितीद्वारे राबविण्यात येणाऱ्या अकरावी द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेचा मंगळवारी सहावा दिवस होता. आतापर्यंत द्विलक्षी अभ्यासक्रमात तीन हजारांवर अधिक प्रवेश झाले असून, आतापर्यंत सुमारे हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारले आहेत. पसंतीच्या महाविद्यालयांत प्रवेश न मिळाल्याने अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या प्रवेश फेऱ्यांना ३ जुलै रोजी सुरुवात झाली होती. पहिल्याच दोन दिवसांत अनेक नामांकित महाविद्यालयांच्या जागा ‘फुल्ल’ झाल्या. शिवाय महाविद्यालयांचे ‘कट आॅफ’देखील वाढल्याचे दिसून आले. मंगळवारपर्यंत द्विलक्षी अभ्यासक्रमात ४२०० पर्यंत गुणवत्ता क्रमांक असलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश फेरी होती. परंतु केंद्रीय प्रवेश समितीने दिलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत ३१८७ प्रवेश झाले आहेत.
सर्वाधिक १,६९७ प्रवेश हे इलेक्ट्रॉनिक्स शाखेत झाले आहेत, हे विशेष. (प्रतिनिधी)

Web Title: Thousands of students rejected admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.