त्र्यंबकेश्वरमधील पुरोहितांकडे आढळले कोट्यवधीचे घबाड
By admin | Published: December 28, 2016 08:39 PM2016-12-28T20:39:21+5:302016-12-28T20:39:21+5:30
त्र्यंबकेश्वर येथील दोन पुरोहितांकडे कोट्यवधीचे घबाड सापडले आहे. प्राप्तिकर विभागाने केलेल्या तपासात दोन पुरोहितांकडून तब्बल
Next
>ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 28 - त्र्यंबकेश्वर येथील दोन पुरोहितांकडे कोट्यवधीचे घबाड सापडले आहे. प्राप्तिकर विभागाने केलेल्या तपासात दोन पुरोहितांकडून तब्बल दोन कोटी रुपयांची रोकड आणि साडेचार किलो सोने जप्त करण्यात आले आहे.
प्राप्तिकर विभागाकडून कालपासूनच संबंधितांची कसून चौकशी सुरू होती. जवळपास 30 तास चाललेल्या चौकशीनंतर प्राप्तिकर विभागाने हे घबाड हस्तगत केले आहे. तसेच या पुरोहितांच्या नावावर मोठ्या प्रमाणावर जमीन आणि अन्य मालमत्ता असल्याचेही समोर आले आहे.
शनिवारपासून सदर कारवाई केली जात असली तरी त्याबाबत गोपनीयता बाळगली गेली होती़ मंगळवारी ही बाब प्रामुख्याने उघडकीस आल्यावर इतरांनी घरातील रोकड इतरत्र हलवण्यास सुरुवात केल्याचे दिसून आले. चौकशी पथकाकडून अनेक पुरोहितांची बँक खाती तपासली जात असल्याचे वृत्त असून, नोटाबंदीनंतर कुणाच्या खात्यात किती रक्कम जमा झाली आहे, याचा तपास सुरू आहे.