रामशेज किल्ल्यावर दुर्ग पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला : -शिवजयंती साजरी करण्यासाठी हजारो पर्यटक

By admin | Published: February 19, 2017 01:32 PM2017-02-19T13:32:47+5:302017-02-19T13:32:47+5:30

छत्रपती शिवाजी महाराज यांची साजरी करण्यासाठी नाशिक शहर व परिसरातून हजारो दुर्ग पर्यटक, स्वयंसेस्वी संस्था

Thousands of tourists to celebrate Shiva-Rishgeh | रामशेज किल्ल्यावर दुर्ग पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला : -शिवजयंती साजरी करण्यासाठी हजारो पर्यटक

रामशेज किल्ल्यावर दुर्ग पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला : -शिवजयंती साजरी करण्यासाठी हजारो पर्यटक

Next

नाशिक - छत्रपती शिवाजी महाराज यांची साजरी करण्यासाठी नाशिक शहर व परिसरातून हजारो दुर्ग पर्यटक, स्वयंसेस्वी संस्था व नागरिकांनी दिंडोरी तालुक्यातील रामशेज किल्ल्यावर पहाटेपासून मोठया प्रमाणावर गर्दी केली होती. मात्र अचानकपणे मधमाशांनी हल्ला केल्याने सर्वत्र एकच धावपळ व पळापळ झाली.
शिवजयंतीचे औचित्य साधून नाशिक शहरातील नामवंत डॉक्टर्स, सायकलिंग ग्रूप, ग्लोबल ग्रूप, सोशल नेटवर्किंग फोरम , वैद्यकिय महाविद्यालय विद्यार्थी मंच, नाशिक मेडिकोज यांचेसह शहरातील नागरिकांनी रामशेज किल्ल्यावर शिवजयंती उत्सव साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार सकाळी सात वाजेपासून पर्यटकांची गडाकडे आगेकूच सुरू झाली. यामध्ये पुरुष , स्त्रियासह लहान बालकांचा व विद्यार्थाचा मोठया प्रमाणावर सहभाग होता. किल्लावरील शिवध्वज स्तंभाजवळ शिवरायांच्या पुतळ्याच्या पूजनाची तयारी सुरू असतांना अचानक कडेकपारी करून मधमाशांचा ओघ सुरु झाला. प्रारंभी विरळ असलेल्या माशा वाढत गेल्या. गडावरील पर्यटकांच्या अंगाला माशा झोंबू लागल्याने एकच पळापळ सुरू झाली. जो तो आपला जीव वाचवत गडावरून पायथ्याकडे पळू लागले. मात्र माशा काही पाठ सोडत नव्हत्या. दिसेल तेथे आसरा घेत माशापासून बचाव करत अवघ्या 15 मिनिटात संपूर्ण गड खाली झाला. अनेकांचे साहित्य, मोबाईल, बॅगा या गडबडीत पडून गेल्या. तर उतरत असतांना पाय घसरून पडल्याने काहींना किरकोळ जखमाही झाल्या. उपस्थित डॉक्टरांनी तात्काळ आपआपल्या हॉस्पीटला फोन करून रुग्णवाहिका मागवल्या तर काहींनी 10 8 ला कॉल केल्याने दहा मिनिटात रामशेजच्या पायथ्याशी सात - आठ रुग्णवाहिका दाखल झाल्या. माशांनी चावा घेतलेल्या रुग्णांवर जागेवर उपचार करण्यात आले. तर काहींना प्राथमिक उपचार करून रुग्णालयात हलवण्यात आले.

Web Title: Thousands of tourists to celebrate Shiva-Rishgeh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.