निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला धमकी

By admin | Published: February 12, 2017 02:21 AM2017-02-12T02:21:53+5:302017-02-12T02:21:53+5:30

नामनिर्देशनपत्राबरोबर अनामत रक्कम न भरल्याने अर्ज बाद करण्यात आलेल्या उमेदवाराला सहकार्य केल्यास जीवे मारण्याची धमकी जी उत्तर प्रभागाच्या निवडणूक

Threat to Election Officer | निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला धमकी

निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला धमकी

Next

मुंबई : नामनिर्देशनपत्राबरोबर अनामत रक्कम न भरल्याने अर्ज बाद करण्यात आलेल्या उमेदवाराला सहकार्य केल्यास जीवे मारण्याची धमकी जी उत्तर प्रभागाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला अज्ञात व्यक्तीकडून आली आहे. असा संदेश मोबाइलवर पाठविणाऱ्या व्यक्तीविरोधात दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक चौकशी सुरू आहे. अशा प्रकारे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला धमकावणे हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा मानला जातो.
निवडणुकीसाठी २१ तारखेला मतदान होणार आहे. ३ फेब्रुवारी हा उमेदवारांचा अर्ज स्वीकारण्याचा शेवटचा दिवस होता. या तारखेला सायंकाळी ४.५९ वाजता प्रभाग क्र. १८८मधून एमआयएमचे उमेदवार दामगिद्दा पुष्पा बलराज यांनी अर्ज दाखल केला. मात्र निवडणूक कार्यालयाने या अर्जाची तपासणी केली असता त्यामध्ये अनामत रक्कम भरल्याच्या पावतीची प्रत जोडण्यात आली नसल्याने निदर्शनास आले. त्यानुसार ही पावती तत्काळ आणून देण्यास निवडणूक कार्यालयातून सदर उमेदवाराला कळविण्यात आले, मात्र अनामत रक्कम आपण भरलीच नसल्याने ती आता स्वीकारावी, अशी विनंती संबंधितांकडून करण्यात आली. अर्ज भरण्याची वेळ संपल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी माया पाटोळे यांनी तो स्वीकारला नाही. प्रभाग क्र. १८२ ते १९२च्या त्या निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. त्यांच्या निर्णयाविरोधात उमेदवाराने उच्च न्यायालयात केलेला दावाही बाद ठरला. परंतु पाटोळे यांना आज सकाळी पाच वाजून ३६ मिनिटांनी ७८९००५१३८० या क्रमांकावरून शिवीगाळ व धमकावणारा संदेश आला. यामध्ये एमआयएमच्या उमेदवाराला घाबरून त्यांना मदत केल्यास त्याचा अर्ज बाद करण्यासाठी जसे पैसे दिले तसे जास्त पैसे देऊन तुला ठार करू शकतो, अशी धमकी देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

- पाटोळे यांना आज सकाळी ५ वाजून ३६ मिनिटांनी शिवीगाळ व धमकावणारा संदेश आला. एमआयएमच्या उमेदवाराला घाबरून त्यांना मदत केल्यास त्याचा अर्ज बाद करण्यासाठी जसे पैसे दिले तसे जास्त पैसे देऊन तुला ठार करू शकतो, अशी धमकी देण्यात आली आहे.

Web Title: Threat to Election Officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.