वांद्रे स्थानक उडवण्याची धमकी

By admin | Published: December 15, 2014 03:58 AM2014-12-15T03:58:51+5:302014-12-15T03:58:51+5:30

वांद्रे स्थानक उडवून देण्याची धमकी देणाऱ्या दोन बांगलादेशी तरुणांना वालीव-वसई येथून अटक करण्यात आली.

Threat to fly off the Bandra Station | वांद्रे स्थानक उडवण्याची धमकी

वांद्रे स्थानक उडवण्याची धमकी

Next

वसई : वांद्रे स्थानक उडवून देण्याची धमकी देणाऱ्या दोन बांगलादेशी तरुणांना वालीव-वसई येथून अटक करण्यात आली. त्यांना कोर्टासमोर हजर केले असता, एका आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. दुसरा अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली.
उल्हासनगरच्या नियंत्रण कक्षाला दोन दिवसांपूर्वी एक कॉल आला. ‘दोन दिवसांत वांद्रे स्थानक उडवण्यात येईल,’ असे सांगितले होते. मुंबईच्या एटीएसला याची माहिती दिली. वालीव पोलिसांनी कॉलची माहिती घेऊन उत्तम चौधरी (२४) व सौरव सरोजी (१५) या दोन बांगलादेशी नागरिकांना अटक केली. गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Web Title: Threat to fly off the Bandra Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.