किशोरी पेडणेकरांच्या उमेदवारीवरुन शिवसेनेमध्ये उफाळला असंतोष

By admin | Published: February 2, 2017 05:25 PM2017-02-02T17:25:51+5:302017-02-02T17:25:51+5:30

स्थानिक उमेदवाराला तिकीट देण्याची शिवसैनिकांनी मागणी केली आहे. वरिष्ठ नेत्यांच्या खोडसाळपणामुळे हा निर्णय झाल्याचे शिवसैनिकांचे म्हणणे आहे.

Threatened dissatisfaction with Shiv Sena on Kishori Pednekar's candidature | किशोरी पेडणेकरांच्या उमेदवारीवरुन शिवसेनेमध्ये उफाळला असंतोष

किशोरी पेडणेकरांच्या उमेदवारीवरुन शिवसेनेमध्ये उफाळला असंतोष

Next

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 2 - वृत्तवाहिन्यांवरील चर्चेमध्ये आक्रमकपणे शिवसेनेची बाजू मांडणा-या शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका किशोरी पेडणेकर यांच्या उमेदवारीवरुन वरळी शिवसेनेमध्ये असंतोष उफाळून आला आहे. वॉर्ड क्रमांक 114 मध्ये किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी देण्याच्या पक्ष नेतृत्वाच्या निर्णया विरोधात शिवसैनिकांनी आज मातोश्रीबाहेर आंदोलन केले. 
 
स्थानिक उमेदवाराला तिकीट देण्याची शिवसैनिकांनी मागणी केली आहे. वरिष्ठ नेत्यांच्या खोडसाळपणामुळे हा निर्णय झाल्याचे शिवसैनिकांचे म्हणणे आहे. शिवसेनेकडून एबी फॉर्मचे वाटप झाल्यानंतर अपेक्षेप्रमाणे काही प्रभागांमध्ये इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी उफाळून आल्याचे चित्र आहे. 
 
वडाळयातही नाराजी 
वरळीप्रमाणे वडाळयामध्येही शिवसैनिकांची नाराजी दिसून आली. वॉर्ड क्रमांक 187 मधून अमेय घोले यांना उमेदवारी देण्याच्या निर्णयाविरोधात शिवसैनिकांनी जोरदार निदर्शने केली. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असल्याने अमेय घोले यांना संधी मिळाली असे शिवसैनिकांचे मत असून, त्यांचे योगदान काय ? असा सवाल त्यांनी केला. वॉर्ड क्रमांक 187 मधून माधुरी मांजरेकर इच्छुक असून, त्यांच्या समर्थकांनी शिवसेना शाखेबाहेर जोरदार निदर्शने केली. 
 

Web Title: Threatened dissatisfaction with Shiv Sena on Kishori Pednekar's candidature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.