त्या मुलीला इसिसमध्ये जाण्यापासून रोखणा-या ATS अधिका-याला धमकी

By admin | Published: January 13, 2016 01:00 PM2016-01-13T13:00:24+5:302016-01-13T13:25:14+5:30

पुण्यातील नामांकित कॉलेजमध्ये शिकणा-या तरूणीला इसिसमध्ये जाण्यापासून रोखणारे एटीएस अधिकारी बर्गे यांना ठार मारण्याची धमकी इसिसने दिली

Threatening the ATS officer who prevented the girl from going to Isis | त्या मुलीला इसिसमध्ये जाण्यापासून रोखणा-या ATS अधिका-याला धमकी

त्या मुलीला इसिसमध्ये जाण्यापासून रोखणा-या ATS अधिका-याला धमकी

Next
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १३ - जगभरात धुमाकूळ माजवणा-या इसिस (इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया) या दहशतवादी संघटनेने पुण्यातील एटीसचे (दहशतवादी विरोधी पथक) प्रमुख भानुप्रताप बर्गे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे
१० जानेवारी रोजी मुंबई पोलीस आयुक्तालयाला 'इसिस'ने एक पत्र पाठवले होते, ज्यात इसिसने भानुप्रताप बर्गे यांना संपवून टाकण्याची धमकी दिली आहे.
काही दिवसांपूर्वीच पुण्यातील एका नामांकित कॉलेजमध्ये शिकणा-या अवघ्या १६ वर्षांची मुलगी इसिसच्या जाळ्यात ओढली गेली होती, त्यानंतर एटीएसच्या पुणे युनिटकडून या मुलीचे समुपदेशन करण्यात आले व तिला 'इसिस'मध्ये जाण्यापासून रोखण्यात आले. त्याच पार्श्वभूमीवर 'इसिस'ने भानुप्रतार बर्गे व त्यांच्या कुटुंबियांना मारण्याची धमकी दिली आहे. 
दरम्यान या पत्राच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या शिवाजी नगर भागातील एटीएस कार्यालयाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. हे पत्र पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले असून विशेष शाखेकडून पत्राची तपासणी सुरू आहे. 
 

 

Web Title: Threatening the ATS officer who prevented the girl from going to Isis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.