"माझ्या जीवाला धोका, माझं ५ वर्षांचं बाळ शिवसेनेला दत्तक; शिवसैनिक सांभाळतील"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 08:54 AM2022-10-14T08:54:39+5:302022-10-14T08:55:48+5:30

आम्ही कुणालाही सॉफ्ट कॉर्नर देत नाही. आम्ही शांत आहोत म्हणून लढायला विसरलो असं नाही असा इशारा सुषमा अंधारे यांनी दिला आहे.

"Threatening my life, 5-year-old baby adopts Shiv Sena; Shiv Sainiks will take care, Sushma Andhare Target CM Eknath Shinde | "माझ्या जीवाला धोका, माझं ५ वर्षांचं बाळ शिवसेनेला दत्तक; शिवसैनिक सांभाळतील"

"माझ्या जीवाला धोका, माझं ५ वर्षांचं बाळ शिवसेनेला दत्तक; शिवसैनिक सांभाळतील"

Next

नवी मुंबई - मला पोलिसांकडून काही इनपुट्स आले, बाहेर पडू नका. कुणी हल्ला करू शकतं. विद्यापीठात आंदोलन करताना पोलीस माझ्या बाजूला आले. तुम्ही सुरक्षित आहात का? अशी विचारणा झाली. पोलिसांकडे काही माहिती असल्याने ते अलर्टवर आहेत असं कळालं. माझ्यावर गुन्हा दाखल करता येईल, हल्ला होऊ शकतो. कमरेखालचे वार केले जाऊ शकतात त्यापलीकडे मला अडवण्यासाठी दुसरं काही केले जाऊ शकत नाही. मला चिंता आहे की, माझ्याकडे ५ वर्षाचं बाळ आहे. ते शिवसेनेला दत्तक देते. सगळे शिवसैनिक मामा म्हणून बाळाला सांभाळतील. उद्धव ठाकरे त्या बाळाचे कुटुंबप्रमुख असतील. आम्ही करेंगे और मरेंगे याच भावनेने लढतोय अशा शब्दात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाचा समाचार घेतला. 

सुषमा अंधारे म्हणाल्या की, आम्ही कुणालाही सॉफ्ट कॉर्नर देत नाही. आम्ही शांत आहोत म्हणून लढायला विसरलो असं नाही. उद्धव ठाकरे हे संयमी नेते आहेत. माझ्या सोसायटीखाली २ कॉन्स्टेबल येऊन बसले. मला सुरक्षा द्यायचं म्हणतायेत. मी याबाबत उद्धव ठाकरेंना माहिती दिली. दिवसभर माझ्यावर तणाव होता. माणूस म्हणून भावनिक असतो. जे होईल ते होईल. बाळाची चिंता वाटली मग नंतर विचार केला त्याची जबाबदारी घ्यायला शिवसैनिक खंबीर आहेत असं त्यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात
ज्या संविधानानं तुमच्या आमच्या मनातील सरकार निवडण्याचा अधिकार दिला. काय काय आक्रित बघायला मिळतंय. माझ्या भावासमोरचा माईक काढून घेतायेत. कागद लिहून वाचायला देतात. माझा भाऊ प्रचंड विद्वान आहे. कॉपी करून पास झालाय का? माझा भाऊ ढ वाटतो का? आमचे राज ठाकरे यांच्यावर मिमिक्री केल्यामुळे किती गुन्हे दाखल केले? माझ्यावर गुन्हे दाखल केल्याने मी शांत होईन असं वाटत असेल तर भ्रमात आहे. जागे व्हा अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात केला आहे. 

तसेच मी सामान्य घरातील महिला आहे. माझ्याकडे पैसा नाही. त्यामुळे मी घाबरत नाही. सुषमा अंधारे शिवसेना उभी करण्याची कामी येत असेल तर गर्व आहे. माझ्या मुलीला मी दत्तक देते. सगळे शिवसैनिक तिचा सांभाळ करतील, कन्यादान कुटुंबप्रमुख उद्धव ठाकरे करतील असंही अंधारे यांनी म्हटलं. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: "Threatening my life, 5-year-old baby adopts Shiv Sena; Shiv Sainiks will take care, Sushma Andhare Target CM Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.