विमान अपहरणाची धमकी, विमानतळांवर हायअलर्ट
By admin | Published: April 16, 2017 12:39 PM2017-04-16T12:39:21+5:302017-04-16T13:45:33+5:30
विमानाचं अपहरण केलं जाणार असल्याची धमकी मिळाल्यानंतर मुंबईसह चेन्नई आणि हैदराबाद विमातळांवरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - विमानाचं अपहरण केलं जाणार असल्याची धमकी मिळाल्यानंतर मुंबईसह चेन्नई आणि हैदराबाद विमातळांवरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. तिनही विमानतळ परिसरात हाय अलर्ट घोषीत करण्यात आला आहे. वृत्तसंस्था पीटीआयने याबाबत वृत्त दिलं आहे.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) चे महासंचालक ओ. पी. सिंग यांनी या तीन विमानतळांवर हाय अलर्ट जारी केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मुंबई पोलीस उपायुक्तांना एका महिलेकडून ईमेल आला. या ईमेलमध्ये एकाच वेळी मुंबई, चेन्नई आणि हैदराबाद विमानतळावर विमानांचे अपहरण करण्याचा कट शिजवला जात असल्याचं तिने म्हटलं. 6 मुलांना यासंबंधी कट शिजवताना ऐकलं असं त्या महिलेने मेलमध्ये म्हटलं आहे. तो मेल फसवणूक करणाराही असू शकतो पण खबरदारी म्हणून सुरक्षा वाढवण्यात आली आहे, अशी माहिती सिंग यांनी दिली.
विमान अपहरणाच्या धमकीनंतर सुरक्षा व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.