12 वेळा मला जिवे मारण्याची धमकी आली - अण्णा हजारे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2017 06:19 PM2017-10-15T18:19:36+5:302017-10-15T22:20:22+5:30

जोपर्यंत मी जिंवत आहे तोपर्यंत समाज आणि देशाला बाधा पोहचवणाऱ्यांच्या विरोधात मी आंदोलन करत राहणार असेही ते म्हणाले.

Threats to kill me 12 times - Anna Hazare | 12 वेळा मला जिवे मारण्याची धमकी आली - अण्णा हजारे

12 वेळा मला जिवे मारण्याची धमकी आली - अण्णा हजारे

Next

मुंबई - गेली 40 वर्षे मी समाज आणि देशासाठी आंदोलन करत आहे, यावेळी मला अनेक समस्यांना सामोर जावं लागलं. आंदोलन करताना मला विरोध होतो, कित्येकवेळा मला तुरुंगात डांबलं गेलं आहे. समाज आणि देशासाठी आंदोलन करतो हे पक्ष आणि पार्टीला रुचत नाही. आतापर्यंत मला 12 वेळा जिवे मारण्याची धमकी मिळाली असल्याचा खुलासा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला. फेसबुक लाईव्हवर जनतेशी संवाद साधत असताना त्यांनी हा खुलासा केला. यावेळी त्यांनी काँग्रेससह भाजपा पक्ष आणि इतर नेत्यांवर घणाघाती टीका केली.

गेल्या 40 वर्षात मला कधीही कोणत्याही पक्षाला अथावा पार्टीचा विचार आला नाही असे म्हणत त्यांनी एकप्रकारे त्यांचे जुने सहकारी अरविंद केजरीवाल आणि किरण बेदी यांच्यावर बोचरी टीका केली.

फेसबुक लाईव्हमध्ये आण्णा हजारे यांनी यापुढे आंदोलन करत राहणार असल्याचे सांगितले. जोपर्यंत मी जिंवत आहे तोपर्यंत समाज आणि देशाला बाधा पोहचवणाऱ्यांच्या विरोधात मी आंदोलन करत राहणार असेही ते म्हणाले. लोकपाल कायदा संसदेतच्या दोन्ही सभागृहात मंजूर होऊनही त्यांनी तो अंमलात आणला नाही. मी वारंवार त्यांना स्मरणपपत्रे लिहित आहे आणि ते मला वारंवार फसवत आहेत. असाही आरोप त्यांनी केला.

पंतप्रधानांनी निवडणुकीत तीस दिवसात काळा पैसा आणण्याचं अश्वासन दिलं होतं. प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये येणार असल्याचं सांगितलं. मात्र तीन वर्षांत पंधरा रुपये सुद्धा आले नसल्याचा आरोप अण्णांनी केला. आशिया खंडात भ्रष्टाचारात पहिल्या क्रमांकावर भारत आहे. तर सरकार भ्रष्टाचारमुक्तीचं अवाहन करुन करोडोंच्या जाहिराती करतंय. मात्र भ्रष्टाचार रोखणारं लोकपाल बिल कमकुवत करत असल्याचा आरोप अण्णांनी केला.
 

Web Title: Threats to kill me 12 times - Anna Hazare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.