लाचखोर महापौरांच्या समर्थकांकडून धमकी

By Admin | Published: February 4, 2015 02:04 AM2015-02-04T02:04:16+5:302015-02-04T02:04:16+5:30

लाचखोर महापौर तृप्ती माळवी यांच्या समर्थकांकडून ठार मारण्याची धमकी दिली जात असल्याचे प्रतिज्ञापत्र तक्रारदार संतोष पाटील यांनी न्यायालयात सादर केले आहे.

Threats from the supporters of the Criminal Mayor | लाचखोर महापौरांच्या समर्थकांकडून धमकी

लाचखोर महापौरांच्या समर्थकांकडून धमकी

googlenewsNext

कोल्हापूर : लाचखोर महापौर तृप्ती माळवी यांच्या समर्थकांकडून ठार मारण्याची धमकी दिली जात असल्याचे प्रतिज्ञापत्र तक्रारदार संतोष पाटील यांनी न्यायालयात सादर केले आहे.
महापौर माळवी यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी मंगळवारी पूर्ण झाल्याने सुनावणीचा अंतिम निकाल विशेष जिल्हा न्यायाधीश के. डी. बोचे बुधवारी देणार आहेत, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पोलीस उपअधीक्षक पद्मा कदम यांनी दिली. तक्रारदारास धमक्या येत असल्याने माळवी यांचा जामीन अर्ज फेटाळला जाण्याची शक्यता आहे.
माळवी यांचा चौकशी जबाब अद्याप अपुरा आहे. जबाबासाठी त्यांना सोमवारी एसीबीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते परंतु रक्तदाब वाढल्याने त्या रुग्णालयात दाखल झाल्या. त्यामुळे त्यांच्या व्हॉईस रेकॉर्डिंगची तपासणी अद्याप झालेली नाही. तपासाच्या दृष्टीने ती आवश्यक आहे. तपासाच्या दृष्टीने माळवी यांना अटक करून पोलीस कोठडी मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर करावा, असा युक्तिवाद जिल्हा सरकारी वकील दिलीप मंगसुळे यांनी मंगळवारी केला.
माळवी यांचा रक्तदाब कमी-जास्त होत असल्याने त्यांची प्रकृती अद्याप स्थिर नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Threats from the supporters of the Criminal Mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.