साडे तीन वर्षांची प्रशासकीय राजवट संपुष्ठात; आतापर्यंत सहावी महिला जि.प.च्या अध्यक्ष पदी

By सुरेश लोखंडे | Published: January 15, 2018 09:15 PM2018-01-15T21:15:46+5:302018-01-15T21:24:54+5:30

जिल्हा परिषदेवर अखेर शिवसेनेच्या नेतृत्वाखाली आदिवासी जमातीमधील मंजुषा जाधव अध्यक्ष पदी विजयी झाल्या. जिल्हा परिषदेच्या इतिहासातील या सहाव्या महिला अध्यक्षा ठरल्यां आहेत.

 Three-and-a-half year administrative regulation; So far, the sixth lady will be the President of ZP | साडे तीन वर्षांची प्रशासकीय राजवट संपुष्ठात; आतापर्यंत सहावी महिला जि.प.च्या अध्यक्ष पदी

साडे तीन वर्षांची प्रशासकीय राजवट संपुष्ठात; आतापर्यंत सहावी महिला जि.प.च्या अध्यक्ष पदी

Next
ठळक मुद्देलोकमतचे भाकित तंतोतंत खरे ठरलेप्रथम क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या शिवसेनेला एका सदस्याचे पाठबळ घेऊन सत्तेत येण्यासाठी राष्ट्रवादी सोबत घ्यावे लागलेसाडे तीन वर्ष प्रशासकीय राजवट असलेल्या या जिल्हा परिषदेवर अखेर शिवसेनेच्या नेतृत्वाखाली आदिवासी जमातीमधील मंजुषा जाधव अध्यक्ष पदी विजयी

सुरेश लोखंडे,
ठाणे : ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्याच्या एतिहासिक घटने प्रसंगी ठाणे जिल्हा परिषद बरखास्त करावी लागली. त्यानंतर विविध कारणांमुळे सुमारे साडे तीन वर्ष प्रशासकीय राजवट असलेल्या या जिल्हा परिषदेवर अखेर शिवसेनेच्या नेतृत्वाखाली आदिवासी जमातीमधील मंजुषा जाधव अध्यक्ष पदी विजयी झाल्या. जिल्हा परिषदेच्या इतिहासातील या सहाव्या महिला अध्यक्षा ठरल्यां आहेत.
       जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी ‘ठाणे जि.प. अध्यक्षा आदिवासी महिला’ या मथळ्या खाली लोकमतने १३ डिसेंबररोजी वृत्तप्रसिध्द करून या स्पर्धेतील अफवा दूर केल्या होत्या. यानंतर विजयी उमेदवार घोषीत होताच मंजुषा जाधव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा असल्याचे भाकित देखील लोकमतते १५ डिसेंबर रोजी प्रसिध्द केले असता ते ही तंतोतंत खरे ठरले आहे. जाधव यांच्या रूपाने आदिवासी महिला अध्यक्षपदी विराजमान होऊन साडे तीन वर्षाच्या प्रशासकीय सत्ता संपुष्ठात आणण्याचा बहुमानही त्यांना सेनेच्या नेतृत्वामुळे मिळाला आहे.
ठाणे जिल्हा परिषदेची स्थापना १९६२ ला झाली असता तेव्हा पासून जाधव यांच्यासह आतापर्यंत २३ अध्यक्ष झाले आहेत. यामध्ये १९६२ ते १९७२ या कालावधीत पांडुरंग देशमुख पहिले अध्यक्ष आहेत. त्यानंतर २९ आॅगस्ट १९७२ ते ७९ या पाच वर्षाच्या कालावधीत वसईच्या ताराबाई नरसिंह वर्तक या ठाणे जि.प.च्या पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या. त्यानंतर वासुदेव वर्तक १९७९ ते ८० या कालावधीत अध्यक्ष होते. त्यानंतर अशोक सिन्हा हे सीईओ २१ दिवसाचे प्रशासक अध्यक्ष होते. यानंतर सुदाम भोईर यांचा एक वर्षाचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा प्रशासक म्हणून सुबोध कुमार यांनी २२ दिवस सत्ता केली. यानंतर मिनालीसेन गवई या १ जुलै १९९० ते १० मार्च १९९२ या कालावधीत महिला प्रशासक अध्यक्षा झाल्या होते. या प्रशासकानंतर १९९७ ते ९८ या दरम्यान माणक एकनाथ पाटील ह्या महिला अध्यक्ष झाल्या. या पाठोपाठ वाड्याच्या रेखा पष्ठे २००७ ते ०९ आणि २०१२ ते ०१४ या दरम्यान राष्ट्रवादीच्या अंबरनाथ येथील सारिका गायकवाड ह्या अध्यक्ष होत्या. त्यानंतर सुमारे साडे तीन वर्षाच्या प्रशासकीय कालावधी नंतर शहापूर मंजुषा जाधव या सहाव्या महिला अध्यक्षा जिल्हा परिषदेला प्राप्त झाल्या आहेत. जाधव यांच्यासह आतापर्यंत २३ अध्यक्षांनी जिल्हा परिषदेचे सत्ता करून ग्रामीण भागाचा विकास केला आहे.
प्रशासकीय राजवटीच्या आधी राष्ट्रवादी  काँग्रेसची जिल्हा परिषदेवर सत्ता होती. शिवसेनेशी युती करून राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेवर सत्ता कायम ठेवत उपाध्यक्ष पद मिळवले आहे. या आधी विभाजनानंतर सुमारे दोन वेळा निवडणुका जाहीर होऊनही त्या झाल्या नाहीत. पहिल्या वेळी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी एकही उमेदवार दिला नाही. या पक्षांच्या बहिष्कारास विचारात न घेता काही पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या आठ सदस्यांनी उमेदवारी अर्ज भरला असता. ते बिन विरोध विजयी झाले. मात्र संख्याबळा ऐवजी जिल्हा परिषद अस्तित्वात आली नाही. त्यानंतर अल्पावधीतच निवडणुका घोषित झाल्या. मात्र बिनविरोध निवडून आलेल्यांचे सदस्यपद कायम ठेवून या निवडणुका होणार होत्या. पण त्यास विरोध करीत न्यायालयात जनहित याचीका दाखल केल्यामुळे निवडणूक होऊ शकली नाही. या निडवणुकीत प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या शिवसेनेला एका सदस्याचे पाठबळ घेऊन सत्तेत येण्यासाठी राष्ट्रवादी सोबत घ्यावे लागले आहे.

Web Title:  Three-and-a-half year administrative regulation; So far, the sixth lady will be the President of ZP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.