सांगलीतील रवींद्र माने खूनप्रकरणी तिघांना अटक

By Admin | Published: May 2, 2017 09:04 PM2017-05-02T21:04:44+5:302017-05-02T21:04:44+5:30

रवींद्र माने याच्या खूनप्रकरणी मुख्य संशयित बाबू शिंदेसह तीन संशयितांना अटक करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे.

Three arrested in connection with the murder of Ravindra Mane in Sangli | सांगलीतील रवींद्र माने खूनप्रकरणी तिघांना अटक

सांगलीतील रवींद्र माने खूनप्रकरणी तिघांना अटक

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 2 - येथील अहिल्यानगरमधील तडीपार गुंड रवींद्र माने याच्या खूनप्रकरणी मुख्य संशयित बाबू शिंदेसह तीन संशयितांना अटक करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. रवींद्र शहरात आल्याची बाबूने पोलिसांना टिप दिली होती. यातून या दोघांत वाद होऊन त्यांनी एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली होती. त्यामुळे रवींद्रची गेम केल्याची कबुली संशयितांनी दिली आहे. याप्रकरणी रवींद्रचा मित्र इमाम मेहबूब शेख (वय १९, रा. अहिल्यानगर, कुपवाड) याची फिर्याद घेऊन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक केलेल्यांमध्ये बाबू उर्फ मल्हारी बबन शिंदे (वय २३, रा. प्रकाशनगर, अहिल्यानगर), ऋषिकेश दिनकर गळवे (१९, वाल्मिकी आवास) व नागेश सुधीर हडदरे (२२, संभाजीनगर, जुना बुधगाव रस्ता, सांगली) यांचा समावेश आहे. त्यांना न्यायालयाने ५ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात आणखी दोघांची नावे निष्पन्न झाली आहेत. खून झाल्यापासून ते फरारी आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. सहा महिन्यापूर्वी रवींद्रला सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. २८ मार्चला तडीपार आदेशचा भंग करुन रवींद्र सांगलीत आला होता. त्याला गुंडाविरोधी पथकाने पकडले होते. पथकाला मी आल्याची टिप बाबू शिंदे याने दिल्याचा संशय रवींद्रला आला होता. याचा त्याने बाबूला जाबही विचारला होता. यातून दोघांत कडाक्याचे भांडण झाले होते. दोघांनी एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली होती. गेली एक महिना त्यांच्यात धुसफूस सुरू होती.

गेल्या आठवड्यात बाबूने रवींद्रच्या गटातील एका तरुणास बोलावून घेतले. त्याला कवलापूर (ता. मिरज) येथील माळावर नेऊन बेदम मारहाण केली होती. ही बाब बाबूला समजताच घटनेपूर्वी एक दिवस अगोदर रवींद्र बाबूच्या घरी गेला होता. त्याने बाबूला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. त्यामुळे दोघांतील वैरत्वाने चांगलाच पेट घेतला होता. बाबूनेही रवींद्रला सोडायचे नाही, अशी शपथच घेतली. त्यानुसार त्याने हत्यारांची जुळवा-जुळव करुन दुसऱ्यादिवशीपासून त्याने रवींद्रचा गेम करण्यासाठी त्याच्यावर पाळत ठेवली. घटनेदिवशी रवींद्र भावाच्या वाढदिवसाची तयारी करण्यात मग्न होता. कलानगर येथे मंडप ठरवून तो तीन मित्रासोबत निघाल्याची संधी साधून बाबूने त्याचा गेम केला होता.
माफी मागायला लावली अन् गेम केला
रवींद्र भावाच्या वाढदिवसासाठी मंडप ठरवून तो घेऊन जात असताना बाबू व त्याच्या साथीदारांनी त्याला कलानगरमधील दत्त मंदिराजवळ गाठले. रवींद्रच्या दुचाकीला मोटारीने पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये रवींद्र व त्याचा मित्र भोराप्पा आमटे उडून पडताच बाबू व साथीदार हत्यारे घेऊन उतरले. त्यांनी रवींद्रला ह्यटार्गेटह्ण केले. बाबूने गेली एक महिनाभर सुरु असलेला वाद उकरुन काढून रवींद्रला स्वत:ची पाय धरुन माफी मागायला सांगितले. रवींद्रनेही घाबरुन खाली वाकून गुडगे जमिनीववर टेकून बाबूच्या डोक्यावर पाय ठेऊन माफी मागत होता. तेवढ्यात बाबू व साथीदारांनी त्याच्या डोक्यात कोयत्याने घाव घातले. रवींद्रला त्यांनी बचावाची कोणतीही संधी दिली नाही, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे. पोलिसांना रवींद्रचा गुडघे टेकलेल्या स्थितीतच मृतदेच आढळून आला होता.
भोराप्पावर खुनाचा गुन्हा
रवींद्रच्या खुनाचा प्रत्यक्षदर्क्षी साथीदार भोराप्पा आमटे आहे. भोराप्पा व रवीद्र एकाचा दुचाकीवर जात होते. रवींद्रची ह्यगेमह्ण करताना भोराप्पाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. बाबूने त्याच्यावरही हल्ला चढविल्यानंतर तो बेशुद्ध पडला होता. त्यामुळे या घटनेचा दुसरा साक्षीदार व रवींद्रचा मित्रा इमाम शेख याची पोलिसांनी फिर्याद घेतली आहे. भोराप्पाविरुद्ध यापूर्वी अहिल्यानगर येथील अनिल पंढरीनाथ वाळूकर (वय २५) याचा खून केल्याचा गुन्हा नोंद आहे. या खुनात भोराप्पासह पाचजणांना अटक झाली होती. टेम्पो आडवा मारल्याच्या क्षुल्लक कारणावरुन माधवनगर येथे हा खून झाला होता.

Web Title: Three arrested in connection with the murder of Ravindra Mane in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.