बनावट नोटांसह तिघांना अटक
By admin | Published: June 5, 2014 09:53 PM2014-06-05T21:53:48+5:302014-06-05T23:17:57+5:30
बनावट नोटा वितरीत करण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना काल पायधुनी पोलिसांनी गजाआड केले.
बनावट नोटांसह तीघांना अटक
मुंबई: बनावट नोटा वितरीत करण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना काल पायधुनी पोलिसांनी गजाआड केले. त्यांच्याकडून पोलिसांनी तब्बल ३ लाख ८० हजार रूपयांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या.
एक टोळी मशिदबंदर परिसरात बनावट नोटांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहीती पायधुनी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस हवलादार सय्यद, माने, कदम आणि राणे यांनी या परिसरात काल दुपारी सापळा रचला होता. ठरलेल्या ठिकाणीअब्दुल शेख(३६), अल्लाउद्दीन शेख (२८) आणि गुलाम शेख (२९) हे तीघेजण याठिकाणी आले. पोलिसांना खबर्याकडून मिळालेल्या वर्णनाचे हे तीघे असल्याची खात्री होताच पोलिसांनी झडप घालून त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ असलेल्या बॅगमध्ये पोलिसांना हजार रुपयांच्या ३८० नोटा अढळुन आल्या. त्यानुसार पोलिसांनी त्यांना अटक केली.
पकडण्यात आलेले तीनही आरोपी हे मुळचे झारखंडचे असून सध्या ते वाकोला परिसरात राहतात. त्यामुळे या बनावट नोटांच्या तस्करीमध्ये एक मोठी टोळी सक्रीय असण्याची शक्यात पोलिसांना आहे. या आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ९ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.