रायगडमध्ये अनंत गीते नावाचे तीन उमेदवार; 2014 ला तटकरे पडलेले, 10 वर्षांनी...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 06:29 PM2024-04-16T18:29:12+5:302024-04-16T18:37:06+5:30

Raigad lok sabha Election: अनंत गीते यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघातून अनंत गीते नावाचे आणखी दोन उमेदवार अपक्ष म्हणून उभे आहेत.

Three candidates named Anant Geete in Raigad lok sabha Election; in 2014 Sunil Tatkare defeat, after 10 years game returns | रायगडमध्ये अनंत गीते नावाचे तीन उमेदवार; 2014 ला तटकरे पडलेले, 10 वर्षांनी...

रायगडमध्ये अनंत गीते नावाचे तीन उमेदवार; 2014 ला तटकरे पडलेले, 10 वर्षांनी...

रायगड लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे गट शिवसेना आणि अजित पवार गट राष्ट्रवादी अशी थेट लढत होत आहे. परंतु तिथे एकाच नावाचे तीन उमेदवार उभे ठाकल्याने अनंत गीतेंची खासदारकी धोक्यात आली आहे. २०१४ मध्ये सुनिल तटकरे नामसाधर्म्यामुळे अवघ्या २००० मतांनी पडले होते. तीच पुनरावृत्ती आता १० वर्षांनी घडविण्याची जोरदार तयारी तटकरेंनी केली आहे. 

अनंत गीते यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघातून अनंत गीते नावाचे आणखी दोन उमेदवार अपक्ष म्हणून उभे आहेत. यामुळे ठाकरेंच्या अनंत गीतेंची मते या दोन अपक्ष गीतेंना जाण्याची दाट शक्यता आहे. शिवसेनेने २०१४ मध्ये खेळलेला डाव आता तटकरे २०२४ मध्ये खेळत आहेत. 

मुख्य उमेदवारांशी नावसाधर्म्य असलेली खेळी ही प्रामुख्याने विरोधकांकडून खेळली जाते. अनेकदा याचा फटका देखील पडलेला निवडणुकांत दिसला आहे. गीते यांची निशानी मशाल असणार आहे. तर अद्याप या दोन अपक्ष गीतेंना निशानी देण्यात आलेली नाही. 

२०१४ मध्ये सुनिल तकटकरे नावाच्या व्यक्तीला निवडणुकीत उतरविण्यात आले होते. त्याने खऱ्या तटकरेंची सुमारे १० हजार मते खाल्ली होती. राष्ट्रवादीच्या तटकरेंना २००० मतांनी पराभव पत्करावा लागला होता. यावेळी गीते निवडून आले होते व केंद्रात अवजड उद्योग मंत्रीही झाले होते. 
 

Web Title: Three candidates named Anant Geete in Raigad lok sabha Election; in 2014 Sunil Tatkare defeat, after 10 years game returns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.