तीन लाचखोर अभियंत्यांना अटक, नाशिकमध्ये कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 03:25 AM2017-10-14T03:25:00+5:302017-10-14T03:25:34+5:30
रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण केलेल्या ठेकेदाराच्या कामाचे अंतिम देयक मंजूर करून ते अदा करण्यासाठी सहा लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यापैकी तीन लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे
नाशिक : रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण केलेल्या ठेकेदाराच्या कामाचे अंतिम देयक मंजूर करून ते अदा करण्यासाठी सहा लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यापैकी तीन लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे (दक्षिण विभाग) कार्यकारी अभियंता देवेंद्र सखाराम पवार, सहायक अभियंता सचिन प्रतापराव पाटील व शाखा अभियंता अजय शरद देशपांडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शुक्रवारी रंगेहाथ पकडले़
एसीबीचे अधीक्षक पंजाबराव उगले यांनी दिलेल्या माहितीनुसार, येवला डांबर प्रकल्पाचे मालक मोहिते हे शासकीय ठेकेदार असून त्यांनी रस्त्याच्या दुरुस्ती कामासाठी २८ टक्के कमी दराची निविदा भरली होती़ त्यांना कंत्राट मिळाले व त्यांनी कामही पूर्ण केले़
कामाचे अंतिम देयक मंजूर करून ठेकेदार मोहितेंना पैसे अदा करण्याकरीता सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पवार, पाटील व देशपांडे यांनी सहा लाखांची मागणी केली होती़ मोहिते यांनी
नाशिकच्या एसीबीकडे तक्रार केली होती़
अधिकाºयांनी शुक्रवारी सापळा रचला़ तीन अभियंत्यांनी मोहितेंकडे सहा लाख रुपयांची मागणी केली़ त्यापैकी तीन लाख रुपये (दोन लाख रुपयांचे मूळ चलन व १ लाख रुपयांचे नकली चलन ) शाखा अभियंता अजय देशपांडे यांनी तक्रारदाराकडून कार्यालयात स्वीकारताच त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले़ देशपांडे यांनी ही रक्कम देवेंद्र पवार व सचिन पाटील यांच्या निदेशानुसार स्वीकारल्याची कबुली दिली़ त्यानंतर पवार व पाटील यांना ताब्यात घेण्यात आले. तिघांच्याही मालमत्तेची चौकशी सुरू होती़