टोकियो ऑलिम्पिकसाठी खेळाडूंना तीन कोटींचा निधी

By admin | Published: February 22, 2017 07:14 PM2017-02-22T19:14:14+5:302017-02-22T19:20:12+5:30

महाराष्ट्र राज्य सरकारकडून 2020 मध्ये होणा-या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी खेळाडूंना तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

Three crore funding for the Games for the Tokyo Olympics | टोकियो ऑलिम्पिकसाठी खेळाडूंना तीन कोटींचा निधी

टोकियो ऑलिम्पिकसाठी खेळाडूंना तीन कोटींचा निधी

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 22 - महाराष्ट्र राज्य सरकारकडून 2020 मध्ये होणा-या  टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी खेळाडूंना तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. 
2020 मध्ये टोकियो येथे होणा-या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भाग घेणा-या खेळाडू आणि इतर सुविधांच्या तयारीसाठी तीन कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असून याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी मंजुरी दिली आहे. 
दरम्यान, गेल्यावर्षी रिओ ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंच्या निराशाजनक कामगिरीनंतर आगामी ऑलिम्पिक स्पर्धामध्ये भारतीय खेळाडूंची कामगिरी सुधारावी, याकरिता केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने कृती दलाची स्थापना केली आहे. यामध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा, राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद आणि माजी हॉकी कर्णधार वीरेन रस्किन्हा यांच्यासह पाच सदस्यांचा समावेश आहे. 

Web Title: Three crore funding for the Games for the Tokyo Olympics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.