तीन कोटींचा गंडा घालणारे अटकेत

By admin | Published: October 22, 2014 06:03 AM2014-10-22T06:03:26+5:302014-10-22T06:03:26+5:30

अनिरूद्ध कुलकर्णी उर्फ फारूख पठाण व आनंद शास्त्री अशी या आरोपींची नावे आहेत. अमरावती येथील चंद्रभान डेमेला यांना या आरोपींनी तीस कोटी रूपयांचे कर्ज मंत्रालयातून मंजूर करून देतो असे सांगितले होते़

Three crores worth of detained | तीन कोटींचा गंडा घालणारे अटकेत

तीन कोटींचा गंडा घालणारे अटकेत

Next

मुंंबई : मंत्रालयातून सुमारे तीस कोटी रूपयांचे कर्ज मंजूर करून देतो असे सांगून अमरावती येथील एका व्यावसायिकाकडून पावणे तीन कोटी रूपये उकळणा-या दोन आरोपींना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
अनिरूद्ध कुलकर्णी उर्फ फारूख पठाण व आनंद शास्त्री अशी या आरोपींची नावे आहेत. अमरावती येथील चंद्रभान डेमेला यांना या आरोपींनी तीस कोटी रूपयांचे कर्ज मंत्रालयातून मंजूर करून देतो असे सांगितले होते़ हे अमिष दाखवताना पठाण याने आपण मंत्रालयातील वित्त विभागाचा सचिव असल्याचे
चंद्रभान यांना सांगितले होते़ विशेष म्हणजे या कर्जापैंकी पाच कोटी
रूपये हे सबसीडी असतील अशी थापही या आरोपींनी चंद्रभान यांना मारली होती.
तसेच कर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पावणे तीन कोटी रूपये लागतील असे सांगून या आरोपींनी त्यांच्याकडून हे पैसे घेतले़
त्यानंतर प्रत्यक्षात कर्ज देताना या आरोपींनी टाळाटाळ केली़ अखेर चंद्रभान यांनी याची पोलिसांत तक्रार केली़ त्यावेळी पोलिसांनी पठाणला औरंगाबाद येथून अटक केली व त्यानंतर शास्त्रीला अटक झाली़
या आरोपींची पोलीस कोठडी घेण्यासाठी त्यांना महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले़ तेथे चंद्रभान यांच्याकडून अ‍ॅड़ प्रकाश साळशिंगीकर यांनी युक्तिवाद केला़ या आरोपींनी चंद्रभान यांची तब्बल पावणे तीन कोटी रूपयांची
फसवूणक केली आहे़ त्यामुळे
अधिक चौकशीसाठी त्यांना पोलीस कोठडी ठोठवावी, असे अ‍ॅड़ साळशिंगीकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले़ ते ग्राह्ण
धरत न्यायालयाने या आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी
केली़ (प्रतिनिधी)

Web Title: Three crores worth of detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.