तीन दिवसांत मान्सून केरळात धडकणार
By admin | Published: June 5, 2016 01:07 AM2016-06-05T01:07:50+5:302016-06-05T01:07:50+5:30
अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने मान्सून येत्या तीन दिवसांत केरळात दाखल होईल, असा अंदाज शनिवारी हवामान विभागाने जाहीर केला आहे.
Next
पुणे : अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने मान्सून येत्या तीन दिवसांत केरळात दाखल होईल, असा अंदाज शनिवारी हवामान विभागाने जाहीर केला आहे.
दरवर्षी मान्सून साधारणपणे १ जूनला केरळमध्ये दाखल होतो़ यंदा तो ७ जूनपर्यंत दाखल होईल, तसेच देशभरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज यापूर्वीच हवामान विभागाने दिला होता. त्या दृष्टीने मान्सूनच्या पुढील वाटचालीस अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे़ गेल्या दोन दिवसांत मान्सूनने बंगालच्या उपसागराच्या काही भागात मजल मारली आहे़ मध्य महाराष्ट्रात गडगडाटी वावटळ, तर विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे़