जोगेश्वरी-गोरेगाव दरम्यान लोकलच्या धडकेत ३ ठार

By Admin | Published: March 11, 2016 06:23 PM2016-03-11T18:23:29+5:302016-03-11T18:24:11+5:30

शुक्रवारी संध्याकाळी पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वरी-गोरेगाव स्थानकांदरम्यान लोकलची धडक बसून ३ जण ठार झाले.

Three dead in Jogeshwari-Goregaon | जोगेश्वरी-गोरेगाव दरम्यान लोकलच्या धडकेत ३ ठार

जोगेश्वरी-गोरेगाव दरम्यान लोकलच्या धडकेत ३ ठार

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - वाढत्या गर्दीमुळे, दरवाजाबाहेर लटकून स्टंट करताना, अशा अनेक घटनांमध्ये प्रवाशांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असतानाच शुक्रवारी संध्याकाळी पश्चिम रेल्वेवर लोकलची धडक बसून ३ जण ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली. पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वरी-गोरेगाव स्थानकांदरम्यान ही दुर्घटना घडली.
रेल्वे रूळ ओलांडणा-या ३ प्रवाशांना भरधाव वेगाने येणा-या लोकलची जोरदार धडक बसली व त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये १ पुरूष, १ महिला व एका लहान मुलाचा समावेश आहे. 

Web Title: Three dead in Jogeshwari-Goregaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.