मराठवाड्यात जूनमध्ये तिघांचे बळी; मारहाणीच्या तब्बल ३० घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 02:03 AM2018-07-02T02:03:09+5:302018-07-02T02:03:55+5:30

मुले पळविणारे समजून औरंगाबाद जिल्ह्यात १५ जून रोजी पडेगाव येथे बेदम मारहाण झालेल्या दोन बहुरुप्यांपैकी एकाचा २८ जून रोजी घाटी रुग्णालयात मृत्यू झाला.

Three dead in Marathwada junction; More than 30 cases of marriages | मराठवाड्यात जूनमध्ये तिघांचे बळी; मारहाणीच्या तब्बल ३० घटना

मराठवाड्यात जूनमध्ये तिघांचे बळी; मारहाणीच्या तब्बल ३० घटना

googlenewsNext

औरंगाबाद : मराठवाड्यात मुले पळविणारी टोळी आल्याच्या अफवांचे महिनाभरापासून व्हॉटस् अपच्या माध्यमातून पीकच आले आहे. मुले पळविणारे समजून औरंगाबाद जिल्ह्यात १५ जून रोजी पडेगाव येथे बेदम मारहाण झालेल्या दोन बहुरुप्यांपैकी एकाचा २८ जून रोजी घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यापूर्वी जून महिन्यातच वैजापूर येथे झालेल्या मारहाणीत दोघांचा मृत्यू झाला. जमावाविरुद्ध केवळ गुन्हा दाखल झाला. कोणालाही अटक झालेली नाही. नांदेड, परभणी, जालना, बीड, हिंगोली, लातूर येथेही मुले पळविणारे समजून मारहाणीच्या ३० घटना घडल्या.

औरंगाबादला तिघांचा मृत्यू
मुले पळविणारे समजून १५ जून रोजी पडेगाव परिसरातील कासंबरी दर्गा परिसरात बेदम मारहाण झालेल्या दोन बहुरुप्यांपैकी एकाचा २८ जून रात्री घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. चोर आल्याच्या अफवेचा औरंगाबाद जिल्ह्यातील हा तिसरा बळी ठरला.
नांदेडला भंगार विक्रेत्यांना चोपले
दोन ठिकाणी पाच भंगार विक्रेत्यांना मारहाण झाली. भोकर येथे बाजारात एका महिलेला, तर मुदखेड येथेही एकाला मारहाण झाली होती.
परभणीत मनोरुग्णाला मारले
मनोरूग्णासह पाच जणांना, सोनपेठ येथे एकाला, गंगाखेड येथे दोघांना आणि पाथरी येथे तिघांना मुले पळविणारे समजून मारहाण झाली. जिल्ह्यात आतापर्यंत ११ जणांना मारहाण झाली आहे.
जालन्यातही घटना
मंठा येथे चार जणांना बेदम मारहाण झाली. त्यात दोन महिला आणि दोन तरूण गंभीर जखमी झाले.
बीडमध्ये गुन्हे दाखल
माजलगावात दोन, गेवराईत दोन आणि बीड, परळीत प्रत्येकी एकाला मारहाण झाली. माजलगावमध्ये १० ते १२ जणांविरूद्ध तर व्हॉटस्अ‍ॅपवर अफवा पसरविणाऱ्या एका तरूणावर गुन्हा दाखल आहे.
लातूरला रिक्षा जाळली
निलंगा येथून ८ जून रोजी आॅटो चालक तानाजी सोनवणे यांना होसूर येथे काही तरुणांनी जबर मारहाण करीत रिक्षा पेटवून दिली.
हिंगोलीतही प्रकार
मुले पळविणारे समजून शहरात दोघांना मारहाण झाली. हे प्रकरण पोलीस ठाण्यात जाण्याआधीच मिटविण्यात आले. कोथळज येथे एकाला मारहाण झाली.

शहाद्यात जाळली होती चारचाकी
म्हसावद (ता़ शहादा, नंदुरबार) येथे नंदकुमार बाळोबा डोंबे, सचिन गुरलिंग तवटे, रामा विठ्ठल शिंदे (तिघे रा़ पंढरपूर) यांना मुले पळवणारे समजून २८ जून रोजी रात्री मारहाण झाली होती़ जमावाने त्यांचे चारचाकी वाहन पोलीस ठाण्याच्या आवारातच जाळून टाकले. एसआरपीएफ जवान आणि पोलीस कर्मचाºयांवर दगडफेक केली. म्हसावद पोलीस ठाण्यात तब्बल २५० लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

मृत नाथपंथी डवरी समाजाचे : मंगळवेढा (जि. सोलापूर): धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात मुले पळविणारी टोळी म्हणून ठार मारण्यात आलेल्यांची ओळख पटली असून, यातील चौघे मंगळवेढा तालुक्यातील आहेत. पोटासाठी वणवण फिरणे हे युवकांना महागात पडले. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात नाथपंथी डवरी समाज मोठ्या संख्येने राहतो. मंगळवेढा तालुक्यात २० गावांमधून १५ ते १६ हजार नाथपंथी डवरी, गोसावी समाजाचे लोक राहतात. या समाजाची पहिली पिढी अद्यापही भिक्षा मागून खाते. दुसºया पिढीला शिक्षणाची थोडीफार ओळख आहे.

साधूंना मारहाण
घोटाणे (ता. नंदुरबार) येथे २९ जून रोजी सकाळी जळगाव व जालना जिल्ह्यातील पाच साधू गावात भिक्षा मागत होते. त्याचवेळी गावातून पाच वर्षीय बालिका बेपत्ता झाल्याची अफवा पसरली़ संशयातून ग्रामस्थांनी साधूंना बेदम मारहाण केली. चौकशीनंतर पोलिसांनी त्यांना सोडून दिले.

ब्राह्मणपुरीत बहुरूपीवर संशय
ब्राह्मणपुरी (ता. शहादा) येथे लोकांचे मनोरंजन करणाºया बहुरूपीवर २९ जून रोजी संशय घेण्यात आला. त्याची चौकशी केल्यानंतर ओळख पटली.
अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील मढी येथील नागरिकांनी संशयातून बुधवारी केलेल्या मारहाणीत जबर जखमी झालेल्या नाशिकच्या राजेश कैलास यंदे याचा शनिवारी दुपारी करंजी येथे मृत्यू झाला़
राजेश यंदे यांचे वडील कैलास यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा मुलगा बुधवारी मढी येथे गेला होता़ घटनेची चौकशी करण्याची मागणीही कैलास शिंदे यांनी केली आहे़
मालेगाव (नाशिक) शहरातील भागात मुले पळवणारी टोळी समजून परभणी जिल्ह्यातील गजानन साहेबराव गिरे व सिंधुताई साहेबराव गिरे या दोघांना जबर मारहाण करण्यात आली. त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Web Title: Three dead in Marathwada junction; More than 30 cases of marriages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.