चार वेगवेगळ्या अपघातांत ३ ठार, ३ जखमी
By admin | Published: May 16, 2017 02:24 AM2017-05-16T02:24:00+5:302017-05-16T02:24:00+5:30
मुंबई-गोवा महामार्गावर चार ठिकाणी झालेल्या वाहन अपघातात तीन मोटारसायकलस्वार ठार तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : मुंबई-गोवा महामार्गावर चार ठिकाणी झालेल्या वाहन अपघातात तीन मोटारसायकलस्वार ठार तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
या महामार्गावर माणगाव तालुक्यातील तिलोरे गावचे हद्दीत रविवारी रात्री आठच्या सुमारास मोटारसायकलला एसटीची धडक लागून झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार शैलेश दळवी (२७, रा.इंदापूर) याचा मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी माणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दुसरा अपघात पेण तालुक्यातील दादर सागरी पोलीस ठाणे हद्दीत दुपारी ४.३५च्या सुमारास झाला. वापी येथील टँकर बळवली फाटा येथे अतिवेगाने जात असताना त्याने मोटारसायकलला धडक दिली. त्यात नितेश जगताप (३०, रा.रासळ पाली) याचा मृत्यू झाला आहे. दादर सागरी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. तर रविवारी संध्याकाळी ७.३० वाजता नागोठण्याजवळ मुंबईकडे जाणारी एसटी नागोठणे बाजूकडून पिकअप गाडीस ओव्हरटेक करीत असताना जोरदार आदळल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील दत्ता वाघमारे (४०,रा.मीरानगर नागोठणे), मंगेश वाघमारे (१८ रा.कारली ता.पेण) हे दोघे जखमी झाले असून त्यांना एम.जी.एम. हॉस्पिटल पनवेल येथे दाखल करण्यात आले आहे. या अपघात प्रकरणी नागोठणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तर शनिवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास माणगाव तालुक्यातील चव्हाणवाडी गावचे हद्दीत मोटारसायकल आणि टेम्पो यामध्ये झालेल्या अपघातात अनिकेत तेवरे (२२,रा.हरवंडी ता.माणगाव) याचा मृत्यू झाला तर योगेश तेवरे हे जखमी असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. माणगाव पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.