शेगडीच्या धुराने गुदमरून पुण्यात तिघांचा मृत्यू

By admin | Published: January 12, 2015 03:41 AM2015-01-12T03:41:28+5:302015-01-12T03:41:28+5:30

थंडीपासून ऊब मिळावी यासाठी दारे-खिडक्या बंद करून शेगडी पेटवून झोपलेले एकाच कुटुंबातील तिघे धुरामुळे गुदमरून मृत्युमुखी पडले.

Three deaths in Pune | शेगडीच्या धुराने गुदमरून पुण्यात तिघांचा मृत्यू

शेगडीच्या धुराने गुदमरून पुण्यात तिघांचा मृत्यू

Next

पुणे : थंडीपासून ऊब मिळावी यासाठी दारे-खिडक्या बंद करून शेगडी पेटवून झोपलेले एकाच कुटुंबातील तिघे धुरामुळे गुदमरून मृत्युमुखी पडले. मृतांमध्ये आई, वडील आणि २२ वर्षीय तरुणीचा समावेश आहे.
भगवान धोंडिबा घारे (५५), त्यांच्या पत्नी मंगला (५०) आणि मुलगी पौर्णिमा अशी त्यांची नावे आहेत. घारे यांचे नारायण पेठेत दुमजली घर आहे. भगवान, मंगलाबाई आणि पौर्णिमा यांनी झोपण्यापूर्वी शेगडी पेटवली होती. वर्कशॉपमधील कामगार रविवारी सकाळी आले. त्यांनी आवाज दिला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. नंतर पोलिसांनी दार तोडून पाहिले असता तिघे बेशुद्ध आढळले. नंतर डॉक्टरांनी त्यांना मृत जाहीर केले.

Web Title: Three deaths in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.