कूलरमधील विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

By Admin | Published: June 2, 2016 09:41 PM2016-06-02T21:41:53+5:302016-06-02T21:41:53+5:30

कूलरमधील विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये पती-पत्नी व त्यांच्या विवाहित मुलीचा समावेश आहे. ही हृदयद्रावक घटना गुरुवारी दुपारी ३.३० च्या सुमारास

Three die from a single family in the cooler's electric shock | कूलरमधील विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

कूलरमधील विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 2 -  कूलरमधील विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये पती-पत्नी व त्यांच्या विवाहित मुलीचा समावेश आहे. ही हृदयद्रावक घटना गुरुवारी दुपारी ३.३० च्या सुमारास मानकापूर येथील रजत हाईटस् अपार्टमेंटमध्ये घडली. 
किशोर शंकर दामले (६१), अंजली किशोर दामले (५५) व विनिशा कमलेश काळे (३३) अशी मृतांची नावे आहेत. दामले सेवानिवृत्त सहायक पोलीस निरीक्षक होते. घटना घडली तेव्हा दामले यांचा १८ महिन्यांचा नातू दुसºया खोलीत झोपलेला होता. विनिशा काही दिवसांपूर्वीच मुलासह आई-वडिलाकडे आली होती. कूलरची हवा वेगात फेकली जात नव्हती. यामुळे विनिशा बिघाड शोधण्यासाठी गेली असता ती कूलरला चिपकली. ती जोरात ओरडायला लागली. दामले दाम्पत्य तिला वाचविण्यासाठी धावले असता त्यांनाही विजेचा जोरदार धक्का लागला. यामुळे तिघांचाही जाग्यावरच मृत्यू झाला. विजेच्या वायरिंगला आवश्यक असलेली अर्थिंग सिस्टिम योग्य नसल्यामुळे ही घटना घडल्याचा आरोप इमारतीतील रहिवाशांनी केला आहे. मानकापूर पोलीस प्रकरणाचा तपास करीत आहेत.
 

Web Title: Three die from a single family in the cooler's electric shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.