दुचाकी घसरल्याने तिघांचा मृत्यू
By admin | Published: May 14, 2017 05:09 AM2017-05-14T05:09:00+5:302017-05-14T05:09:00+5:30
महाड तालुक्यातील बिरवाडी वाळण मार्गावर काळीज गावाजवळ दुचाकी घसरून झालेल्या अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला
लोकमत न्यूज नेटवर्क
महाड : महाड तालुक्यातील बिरवाडी वाळण मार्गावर काळीज गावाजवळ दुचाकी घसरून झालेल्या अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी मध्यरात्री १२च्या दरम्यान काळीज गावाजवळ अपघात झाला.
तेजस जगताप (२६), हरेश उतेकर (२८) आणि पांडुरंग उतेकर (३२, तिघेही रा. वाळण बुद्रुक) अशी तरु णांची नावे आहेत. हे तिघे एम एच १२ जीडी ७७७४ या क्रमांकाच्या दुचाकीने बिरवाडीकडून वाळण येथे जात होते. काळीज गावाजवळ पावसामुळे निसरड्या झालेल्या रस्त्यावरून दुचाकी घसरली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबावर आदळली. अपघातात डोक्याला गंभीर मार लागल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला. एकाच गावातील तीन तरुणांच्या अपघाती निधनामुळे वाळण खुर्द गावावर शोककळा पसरलेली आहे. अपघाताची नोंद महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात केली आहे.