नाशिकमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तीन अभियंत्यांना लाच घेताना रंगेहाथ अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 11:08 PM2017-10-13T23:08:56+5:302017-10-13T23:18:55+5:30

नाशिक : रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण केलेल्या ठेकेदाराच्या कामाच्या अंतिम देयक मंजूर करून ते अदा करण्यासाठी सहा लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यापैकी तीन लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे (दक्षिण विभाग) कार्यकारी अभियंता देवेंद्र सखाराम पवार, सहायक अभियंता सचिन प्रतापराव पाटील व शाखा अभियंता अजय शरद देशपांडे या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि़१२) रंगेहाथ पकडले़

Three engineers of Public Works Department in Nashik were arrested for accepting bribe | नाशिकमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तीन अभियंत्यांना लाच घेताना रंगेहाथ अटक

नाशिकमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तीन अभियंत्यांना लाच घेताना रंगेहाथ अटक

Next
ठळक मुद्देलाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाईसहा लाख रुपयांची मागणी तीन लाख रुपये स्वीकारतांना अटक

नाशिक : रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण केलेल्या ठेकेदाराच्या कामाच्या अंतिम देयक मंजूर करून ते अदा करण्यासाठी सहा लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यापैकी तीन लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे (दक्षिण विभाग) कार्यकारी अभियंता देवेंद्र सखाराम पवार, सहायक अभियंता सचिन प्रतापराव पाटील व शाखा अभियंता अजय शरद देशपांडे या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि़१२) रंगेहाथ पकडले़


लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक पंजाबराव उगले यांनी दिलेल्या माहितीनुसार येवला डांबर प्रकल्पाचे मालक मोहिते हे शासकीय ठेकेदार असून त्यांनी गंगापूर डॅम ते दुगाव फाटा या रस्त्याच्या दुरुस्ती कामासाठी २८ टक्के कमी दराची निविदा भरली होती़ त्यानुसार त्यांना कंत्राट मिळाले व त्यांनी कामही पूर्ण केले़ या कामाचे अंतिम देयक मंजूर करून ठेकेदार मोहिते यांना पैसे अदा करण्याकरीता सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पवार, पाटील व देशपांडे यांनी त्यांच्याकडे सहा लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती़ याबाबत मोहिते यांनी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती़


मोहिते यांच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची खातरजमा करून शुक्रवारी सापळा रचला़ त्यानुसार कार्यकारी अभियंता पवार, सहायक अभियंता पाटील व शाखा अभियंता देशपांडे यांनी मोहिते यांच्याकडे सहा लाख रुपयांची मागणी केली़ त्यापैकी तीन लाख रुपये (दोन लाख रुपयांच्या मूळ चलन व १ लाख रुपयांच्या नकली चलन ) शाखा अभियंता अजय देशपांडे यांनी तक्रारदाराकडून सार्वजनिक बांधकाम विभाग (दक्षिण उपविभाग) कार्यालयात स्वीकारताच रंगेहाथ पकडण्यात आले़ लाचलुचपत खात्याने देशपांडे यांना रंगेहाथ पकडल्यानंतर त्यांनी ही रक्कम कार्यकारी अभियंता (दक्षिण विभाग) देवेंद्र पवार व सहायक अभियंता सचिन पाटील यांच्या निदेशानुसार स्वीकारल्याची कबुली दिली़

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात धाव घेत कार्यकारी अभियंता देवेंद्र पवार व सहायक अभियंता सचिन पाटील यांना ताब्यात घेतले़ त्यांची कसून चौकशी केल्यानंतर मालमत्तेच्या चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेण्यात आले़ दरम्यान, रात्री उशिरापर्यंत या तिघांच्याही मालमत्तेची चौकशी सुरू होती़ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक पी़बी़घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली़

Web Title: Three engineers of Public Works Department in Nashik were arrested for accepting bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.