जनावरांच्या हाडापासून पावडर तयार करणारे तीन कारखाने सिल

By Admin | Published: July 27, 2016 06:59 PM2016-07-27T18:59:32+5:302016-07-27T20:13:55+5:30

जनावरांच्या हाडापासून पावडर आणि तेल तयार करणारे तीन अनधिकृत कत्तल कारखाने बंद करण्याचे आदेश तेजस चव्हाण यांनी दिल्यानंतर बुधवारी तिन्ही कारखान्यांना सिल ठोकले आहे.

Three factories producing coconut from animal bone | जनावरांच्या हाडापासून पावडर तयार करणारे तीन कारखाने सिल

जनावरांच्या हाडापासून पावडर तयार करणारे तीन कारखाने सिल

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
उस्मानाबाद, दि. २७ :  तालुक्यातील पिंपरी, चिलवडी परिसरातील जनावरांच्या हाडापासून पावडर तसेच तेल तयार करणारे तीन कारखाने उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सील करण्यात आले. कडेकोट पोलिस बंदोबस्तात तहसीदार व मंडळ अधिकाऱ्यांच्या पथकाने बुधवारी ही कारवाई केली.

उस्मानाबाद तालुक्यातील पिंपरी तसेच चिवडी परिसरात जनावरांच्या हाडापासून पावडर तसेच तेल तयार करणारे कारखाने सुरू आहेत. सदरील उद्योगामुळे उग्र वास येत असल्याची तक्रार पिंपरी, सुर्डी, झरेगाव, वलगुड, जुनोनी, राघुचीवाडी येथील ग्रामस्थांनी केली होती. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले होते. एवढेच नाही तर उग्र वासामुळे मजूरही शेतीमध्ये काम करण्यास येत नव्हते. मांस आणि हाडांमुळे परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला होता. या मोकाट कुत्र्यांनी अनेक शेतकरी, तसेच जनावरांचे लचके तोडल्याच्या घटनाही घडल्या होत्या.

एवढेच नाही तर मांस आणि हाडे वाहून आणणारी वाहनेही वलगूड येथील तलावामध्ये धुतली जात असत. त्यामुळे प्रकल्पातील पाणी दुर्गंधीयुक्त बनले होते. असे दुर्गंधीयुक्त पाणी पिऊन काही शेतकऱ्यांची जनावरे दगावल्याबाबतच्या तक्रारी उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण यांच्याकडे आल्या होत्या. तक्रारीच्या अनुषंगाने ग्रामसेवक, सरपंच आणि उपसरपंच यांच्या पथकाने संयुक्तरित्या चौकशी केली असता यातील तीन कारखाने अनधिकृतरित्या सुरू असल्याचे निदर्शनास आले.

त्यांना लातूर येथील महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाची मंजुरीही नव्हती. दरम्यान, याची गंभीर दखल घेत तेजस चव्हाण यांनी १२ जुलै रोजी संबंधित कारखान्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार बुधवारी तहसीलदार आणि मंडल अधिकारी यांच्या पथकाने अवैधरित्या सुरू असलेले मुद्येशीर कुरेशी यांचे मे. अलकुरेश बोन मिल, अलिम कुरेशी यांचे मे. एमन एंटरप्रायजेस तर संमती पत्रातील नियम व अटींचे पालन न केल्याचा ठपका ठेवत मे. सिफा बोन मिल अ‍ॅड फर्टीलायझर्स पिंपरी हे कारखाने सील केले. दरम्यान, अटींचे पालन न केल्याप्रकरणी अन्य दोन कारखान्यांवर कारवाई करण्यात आली आहे. परंतु, त्यांची नावे समजू शकली नाहीत.

शंभरावर पोलिस कर्मचारी
अनधिकृतरित्या चालविण्यात येणाऱ्या कारखान्याविरूद्ध कारवाई करताना कुठल्याही स्वरूपाचा अनुचित प्रकार घडू नये, म्हणून तहसील प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली होती. सुमारे शंभरावर पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. त्यामुळे कारखाना परिसराला छावनीचे स्वरूप आले होते.

Web Title: Three factories producing coconut from animal bone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.