मराठवाडय़ात तीन शेतक:यांची आत्महत्या

By admin | Published: November 9, 2014 01:58 AM2014-11-09T01:58:15+5:302014-11-09T01:58:15+5:30

नांदेड, परभणी व बीड जिलतील तीन शेतक:यांनी नापिकी आणि कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.

Three farmers in Marathwada: Suicide | मराठवाडय़ात तीन शेतक:यांची आत्महत्या

मराठवाडय़ात तीन शेतक:यांची आत्महत्या

Next
पाटोदा/श्रीक्षेत्र माहूर/गंगाखेड : नांदेड, परभणी व बीड जिलतील तीन शेतक:यांनी नापिकी आणि कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. 
पाटोदा तालुक्यातील नफरवाडी येथील दिनकर कोंडीबा मंडलीक (5क्) या अल्पभूधारक शेतक:याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. दिनकर मंडलीक यांच्या पत्नीचे नुकतेच ऑपरेशन झाले होते. या प्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 
श्रीक्षेत्र माहूर तालुक्यातील मौजे मुरली येथील मौजे मुरली येथील आनंद रामराव गटगिळे (3क्) या शेतक:याने नापिकी, बँकेचे व सावकारी कर्ज कसे फेडावे या चिंतेने शेतात विषारी द्रव पिवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. आनंद गटगिळे यांच्या मागे वृद्ध आई-वडील, पत्नी, दोन मुले आहेत. 
गंगाखेड तालुक्यातील सुपा येथे देवीदास नानाजी घोगरे(6क्) या शेतक:याने सततच्या नापिकीमुळे कंटाळून आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली़ खरीप हंगामात नुकसानच झाले. पाऊस न पडल्याने पदरी काहीच पडले नाही. त्यामुळे देवीदास घोगरे यांनी आत्महत्या केली. या प्रकरणी पिंपळदरी पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली आह़े (प्रतिनिधी)
 
नेवाशात शेतक:याची आत्महत्या
नेवासा येथील पोपट चंद्रभान भालेराव (38) या शेतक:याने कजर्बाजारीपणाला कंटाळून झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शनिवारी सकाळी निदर्शनास आल़े या घटनेची पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आह़े पोलिसांना मयत पोपट भालेराव यांच्या खिशात एक चिठ्ठी मिळाली असून, माझी शेती पाण्याअभावी पिकली नाही़ त्यातच मी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना, खादी ग्रामोद्योग मंडळाचे कर्ज फेडू शकलो नाही. संबंधीत मंडळाकडून मला जमीन दुस:याला देण्याचे नोटीसीने  कळविले होते. म्हणून मी कर्जाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत म्हटले आहे.  

 

Web Title: Three farmers in Marathwada: Suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.