मराठवाड्यात तीन शेतकऱ्यांची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 05:50 AM2018-07-31T05:50:24+5:302018-07-31T05:50:41+5:30

नापिकी आणि पीककर्ज न मिळाल्याने नांदेड जिल्ह्यातील दोन आणि परभणी जिल्ह्यातील एका शेतकºयाने मृत्यूला कवटाळले.

 Three farmers suicides in Marathwada | मराठवाड्यात तीन शेतकऱ्यांची आत्महत्या

मराठवाड्यात तीन शेतकऱ्यांची आत्महत्या

googlenewsNext

औरंगाबाद : नापिकी आणि पीककर्ज न मिळाल्याने नांदेड जिल्ह्यातील दोन आणि परभणी जिल्ह्यातील एका शेतकºयाने मृत्यूला कवटाळले.
माहूर (जि. नांदेड) तालुक्यातील मालवडा येथील सुभाष भोपा जाधव या अल्पभूधारक शेतकºयाने सततची नापिकी, राष्ट्रीयीकृत बँकेचे थकित कर्ज व बँकेत चकरा मारूनही पीककर्ज मिळत नसल्याने रविवारी दुपारी ४ वाजता स्वत:च्या शेतात विष प्राशन करुन आत्महत्या केली. तालुक्यात एकमेव असलेल्या एस.बी.आय. बँकेकडे मागील दोन महिन्यांपासून अनेक शेतकºयांचे पीककर्ज प्रलंबित आहे. ३० जुलै रोजी मयताचे मोठे बंधू अशोक भोपा जाधव यांनी तहसील कार्यालयात निवेदन देऊन शासनाच्या शेतकरी आत्महत्या योजनेतून कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.
मुखेड तालुक्यातील सलगरा बु. येथील शेतकरी शेख तय्यबसाब उमेदअली (५०) यांनी दोन वर्षांपासून सततच्या नापिकीला कंटाळून सोमवारी पहाटे विष प्राशन करुन आत्महत्या केली. त्यांनी काही लोकांकडून खाजगी कर्ज घेतले होते. मुलगा व पत्नी नेहमीच आजारी पडत असल्याने खाजगी लोकांचे कर्ज फेडायचे कसे, या चिंतेने ते ग्रासले होते़ त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी व पत्नी असा परिवार आहे.

रेल्वेसमोर उडी घेतली
सततची नापिकी व बँकेचे कर्ज कसे फेडायचे, या चिंतेतून मुंजाजी बापूराव बोकारे (६५) या शेतकºयाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी ६़४५ च्या सुमारास फुकटगाव (जि़ परभणी) परिसरात उघडकीस आली़ बोकारे यांना फुकटगाव शिवारात अडीच एकर शेती आहे़ त्यांच्यावर महाराष्ट्र बँकेचे एक लाख रुपयांचे कर्ज होते़ चार वर्षांपासून शेती पिकत नव्हती़ बँकेचे कर्ज कसे फेडावे, याची चिंता त्यांना होती़ यातूनच मुंजाजी बोकारे यांनी सोमवारी फुकटगाव शिवारात कोणत्या तरी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली़ ही घटना सायंकाळी ६़४५ च्या सुमारास उघडकीस आली़ त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे़

Web Title:  Three farmers suicides in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.