मराठवाड्यात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या
By admin | Published: August 5, 2015 01:30 AM2015-08-05T01:30:17+5:302015-08-05T01:30:32+5:30
नापिकी व कर्जाला कंटाळून मराठवाड्यात दोन दिवसांत तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. लातूर जिल्ह्यातील निलंगा व जळकोट तसेच नांदेड
लातूर/नांदेड : नापिकी व कर्जाला कंटाळून मराठवाड्यात दोन दिवसांत तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. लातूर जिल्ह्यातील निलंगा व जळकोट तसेच नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात प्रत्येकी एका शेतकऱ्याने स्वत:चे जीवन संपविले.
निलंगा तालुक्यातील हणमंतवाडी येथील संजय सूर्यवंशी(२२) याने सोमवारी मध्यरात्री गळफास घेऊन आणि जळकोट तालुक्यातील चाटेवाडी येथील लक्ष्मण चाटे याने मंगळवारी सकाळी विषप्राशन करून आत्महत्या केल्या़ संजय सूर्यवंशी यांचे वडिल प्रकाश यांनीही दहा वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. नांदेड जिल्ह्यातील भाऊसाहेब कांबळे (३५, रा. मंगलसांगवी,ता. कंधार) यांनीही सोमवारी सकाळी गळफास घेऊन स्वत:ला संपविले.