अपहरणकर्त्यापासून सुटका करत चेन्नईतील तीन मुलींची मुंबईकडे धाव
By admin | Published: June 28, 2016 05:32 PM2016-06-28T17:32:32+5:302016-06-28T17:32:32+5:30
अपहरणकर्त्यांपासून सुटका करत चेन्नईत राहणा-या आणि दहावीत शिकणा-या तीन मुलींनी थेट मुंबई गाठल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेनंतर मुंबई मध्य रेलवे सुरक्षा दलाने चेन्नई
- सुशांत मोरे
मुंबई, दि. २८ - अपहरणकर्त्यांपासून सुटका करत चेन्नईत राहणा-या आणि दहावीत शिकणा-या तीन मुलींनी थेट मुंबई गाठल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेनंतर मुंबई मध्य रेलवे सुरक्षा दलाने चेन्नई पोलीस आणी मुलींच्या नातेवाईकाशी संपर्क साधून सगळी घटना समोर आणली. तिन्ही मुलींचे नातेवाईक त्यांना ताब्यात घेण्यासाठी मुंबईला रवाना झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. यासंदर्भात चेन्नई पोलिसही अधिक तपास करत आहेत.
चेन्नईत राहणा-या 15 वर्षीय तीन मुली 10 वीत शिकतात. सोमवारी या तिघी शाळेत जाण्यासाठी निघाल्या आणी मनीपुट्टोर या बसस्टॉप वर बसची वाट पहात होत्या. त्यातील एका मुलीने शाळेत लागणा-या वस्तू घरीच विसरल्याचे सांगत समोरच्या दुकानाकडे धाव घेतली.त्यांचा पाठोपाठ अन्य दोन मुलीही गेल्या. तेव्हाच एक व्हॅन जवळ आली असता त्यातील एका इसमाने मुलीना पत्ता विचारला. ते पत्ता सांगत असतनाच त्यांना गाडीत खेचले. व्हॅन सुरु झाल्यानंतर सदर इसमाशी त्या तिघींची झटापट झाली आणी चेन्नईतील टी-नगर जंक्शनजवळ संधी साधत त्या गाडीतुन उतरल्या आणि समोरच असलेल्या सेंट्रल चेन्नई स्थानक गाठले. समोर चेन्नई एक्सप्रेस दिसताच त्यानी जीव वाचवण्यासाठी त्या ट्रेनमधे चढल्या. ही ट्रेन सीएसटी स्टेशनवर आल्यानंतर त्या घाबरलेल्या अवस्थेत बघून एका महिला प्रवाशांने त्यांचाकडे विचारणा केली. तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला.