बिबट्याच्या हल्ल्यात तिघे जखमी, संगमेश्वरच्या मुर्शीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2017 12:40 PM2017-09-16T12:40:07+5:302017-09-16T12:40:57+5:30
बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तिघेजण जखमी झाल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील मुर्शी येथे घडली आहे.
रत्नागिरी, दि. 16 - बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तिघेजण जखमी झाल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील मुर्शी येथे घडली आहे. साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करुन तिघांनाही रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
मुर्शी सुवरेवाडी येथे शनिवारी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. तुकाराम शिवगण यांच्या घराचा मागील दरवाजा उघडा होता. अचानक एक कुत्रा घरात घुसला आणि त्याच्या पाठोपाठ बिबट्याही घरात घुसण्याच्या तयारीत होता. तोवर जाग आलेल्या शिवगण यांनी दार लावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यात बिबट्याने त्यांच्या हाताचा चावा घेतला. त्यामुळे त्यांनी आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून शेजारी राहणारे गणपत सुवरे आणि रामचंद्र सुवरे हे त्यांच्या मदतीला धावून आले. मात्र बिबट्याने त्यांच्यावरही हल्ला केला. गणपत यांच्या डोक्याला तर रामचंद्र यांच्या हाताला दुखापत झाली आहे. या तिघांनाही रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.