काश्मीरमधील हिमस्खलनात महाराष्ट्रातील 3 जवान शहीद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2017 03:36 PM2017-01-27T15:36:47+5:302017-01-27T15:44:13+5:30
काश्मीरमधील गुरेझ सेक्टर येथे झालेल्या हिमस्खलनात महाराष्ट्रातील तीन जवान शहीद झाले आहेत. अकोल्यातील दोन तर बीडमधील एका जवानाचा यात समावेश आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - काश्मीरमधील गुरेझ सेक्टर येथे झालेल्या हिमस्खलनात महाराष्ट्रातील तीन जवान शहीद झाले आहेत. अकोल्यातील दोन तर बीडमधील एका जवानाचा यात समावेश आहे. अकोल्याचे शिपाई आनंद गवई, संजय खंडारे, बीडचे विकास समुद्रे हे जवान हिमस्खलनात शहीद झाले आहेत.
काश्मीरमधील गुरेझ सेक्टर येथे हिमस्खलनाच्या झालेल्या दुर्दैवी घटनेत 14 जवान शहीद झाले आहेत. हिमस्खलन झाल्यामुळे बर्फाच्या कड्याखाली सापडून या जवानांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती लष्कराच्या अधिका-यांनी दिली आहे. बंदीपोरा जिल्ह्यातील गुरेझ सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळच हिमस्खलनाच्या या दोन विचित्र घटना घडल्या आहेत. बर्फाची कडा कोसळल्यानं अनेक जवान बर्फाखाली दबले गेले.
लष्करानं शोधमोहीम राबवत आतापर्यंत एका अधिका-यासह सात जवानांना वाचवण्यात यश मिळवले. गेल्या तीन दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणात हिमवर्षाव होत आहे. त्यामुळे हिमस्खलनाच्या घटना वारंवार घडत असून, हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.