मुंबईच्या व्यापा-याचे तीन किलो सोने यवतमाळात लंपास
By admin | Published: September 9, 2016 05:39 PM2016-09-09T17:39:41+5:302016-09-09T17:39:41+5:30
मुंबईच्या सुवर्ण व्यापा-याचे ७० लाख रुपये किंमतीचे तीन किलो सोन्याचे दागिने असलेली बॅग यवतमाळच्या मध्यवर्ती बसस्थानकावरुन शुक्रवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास लंपास करण्यात आली.
Next
style="font-family: HelveticaNeue, "Helvetica Neue", Helvetica, Arial, "Lucida Grande", sans-serif; font-size: 16px;">
ऑनलाइन लोकमत
यवतमाळ, दि. ९ - मुंबईच्या सुवर्ण व्यापा-याचे ७० लाख रुपये किंमतीचे तीन किलो सोन्याचे दागिने असलेली बॅग यवतमाळच्या मध्यवर्ती बसस्थानकावरुन शुक्रवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास लंपास करण्यात आली.
कुलाबा मुंबई येथील विकास शांतीलाल धाकड आणि विमल जैन हे व्यापारी अमरावतीवरून आदिलाबादला गेले होते. तेथून रात्री यवतमाळला आले. त्यांनी यवतमाळातील चार ते पाच सराफ व्यापाºयांकडे दागिन्यांची विक्री केली. त्यानंतर ते येथील दत्त चौक स्थित मकरंद हॉटेलमध्ये ते मुक्कामाला होते. कारंजा येथे जाण्यासाठी शुक्रवारी सकाळी ७ वाजता ते यवतमाळच्या बसस्थानकावर पोहोचले. जालना एसटी बसमध्ये चढत असताना त्यांच्या बॅगेला चिरा मारून सोन्याच्या तीन किलो वजनाच्या दागिन्यांचा बॉक्स लंपास केला गेला. एसटीमध्ये बसल्यानंतर चोरीची ही घटना निदर्शनास आली. लगेच या व्यापाºयाने वडगाव रोड पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी यवतमाळातील बॅग लिफ्टरवर लक्ष केंद्रीत केले आहे. शिवाय व्यापाºयाचाही काही गोंधळ तर नाही ना या दृष्टीनेही तपास चालविला आहे.