३० लाखांत विकल्या तिघांच्या किडन्या!

By admin | Published: December 2, 2015 01:27 AM2015-12-02T01:27:27+5:302015-12-02T01:27:27+5:30

अकोला पोलिसांनी किडनी तस्करांचे रॅकेट उघड केले असून, ३० लाख रुपयांमध्ये तीन किडन्या विकल्याची माहिती समोर आली आहे. पैशांचे आमिष दाखवून एका ५0वर्षीय महिलेसह

Three kidney sellers sold 30 lakhs! | ३० लाखांत विकल्या तिघांच्या किडन्या!

३० लाखांत विकल्या तिघांच्या किडन्या!

Next

- सचिन राऊत,  अकोला
अकोला पोलिसांनी किडनी तस्करांचे रॅकेट उघड केले असून, ३० लाख रुपयांमध्ये तीन किडन्या विकल्याची माहिती समोर आली आहे. पैशांचे आमिष दाखवून एका ५0वर्षीय महिलेसह ३0 वर्षे वयाच्या दोन युवकांच्या किडन्या तस्करांनी विकल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरिहरपेठमधील रहिवासी असलेल्या दोघांची किडनी तस्करीच्या संशयावरून स्थानिक गुन्हे शाखेकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. या दोघांमधील एकाने तत्काळ पासपोर्ट काढल्याचे समोर आले आहे. त्याने हरिहरपेठ पोलीस चौकी परिसरातील तीन जणांच्या किडनीचा खरेदी-विक्रीचा व्यवहार केल्याचे उजेडात आले आहे. त्यात शांताबाई नामक ५०वर्षीय महिलेचा समावेश आहे. या महिलेला १० लाख रुपयांचे आमिष दाखवून, तिची किडनी काढण्यात आली. याशिवाय ३० वर्षांखालील दोन युवकांच्याही किडनी काढण्यात आल्याचे समजते. पोलिसांच्या चौकशीत या तिघांची नावे समोर आल्याची माहिती आहे; मात्र स्थानिक गुन्हे शाखेने त्याच्यावर अजून अधिकृतपणे शिक्कामोर्तब केलेले नाही. गुन्हे शाखेचे पोलीस या आंतरराष्ट्रीय टोळीच्या मुसक्या आवळण्याच्या तयारीत आहेत.

हलाखीच्या आर्थिक परिस्थितीचा घेतला फायदा
किडनी तस्करांनी ५०वर्षीय शांताबाई, अमर आणि देवा यांची किडनी काढून, त्या प्रत्येकी १0 लाख रुपयांत गरजूंना विकल्याची माहिती समोर येत आहे. तिघांचीही आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची असल्याचे समजते.

Web Title: Three kidney sellers sold 30 lakhs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.