साखर कारखान्यातील स्फोटात तिघांचा मृत्यू
By admin | Published: April 6, 2016 05:21 PM2016-04-06T17:21:08+5:302016-04-06T17:21:08+5:30
साखर कारखान्यातील काकवीच्या (मोलासेस) टँकचा आज सकाळी ११ च्या सुमारास स्फोट होऊन विनोद जोंधळे, शाम पगारे, बाळू देवरे या 3 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. ६- प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील सहकारी साखर कारखान्यातील काकवीच्या (मोलासेस) टँकचा आज सकाळी ११ च्या सुमारास स्फोट होऊन विनोद जोंधळे, शाम पगारे, बाळू देवरे या 3 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर अन्य १० ते १२ जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने लोणी येथील प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हा कारखाना राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अधिपत्याखाली चालवला जातो. स्फोट नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्यापि समजू शकलेले नाही. सकाळी ११ च्या सुमारास हा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज इतका जबरदस्त होता की, आजूबाजूचा परिसरही हादरला. सध्या या कारखान्याचा गळीत हंगाम सुरू आहे.
घटना घडताच कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय राधाकृष्ण विखे हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. या अपघातात दोन लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती सुजय विखे पाटील यांनी दिली आहे. दरम्यान याप्रकरणी लोणी पोलीस अधिक तपास करत आहेत.