तीन लाखांची मंजुरी २५ हजारांवर बोळवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2016 07:38 PM2016-12-23T19:38:14+5:302016-12-23T20:26:19+5:30

वसंतराव नाईक विकास महामंडळाच्या लातूर कार्यालयातील तत्कालीन जिल्हा व्यवस्थापकांनी अहमदपूर येथील ६ लाभार्थ्यांची फसवणूक केली. त्यांच्या नावावर प्रत्येकी ३ लाखांचे

Three lakh sanctioned 25 thousand rupees | तीन लाखांची मंजुरी २५ हजारांवर बोळवण

तीन लाखांची मंजुरी २५ हजारांवर बोळवण

Next
>ऑनलाइन लोकमत/सितम सोनवणे
लातूर, दि. 23 -  वसंतराव नाईक विकास महामंडळाच्या लातूर कार्यालयातील तत्कालीन जिल्हा व्यवस्थापकांनी अहमदपूर येथील ६ लाभार्थ्यांची फसवणूक केली. त्यांच्या नावावर प्रत्येकी ३ लाखांचे कर्ज मंजूर करून घेतले. मात्र त्यांना प्रत्येकी २५ हजारांची जुजबी रक्कम देऊन उर्वरित प्रत्येकी पावणे तीन लाखांची रक्कम हडप केली. विशेष म्हणजे भटके विमुक्त (छप्परबंद) असल्याचे खोटे शपथपत्रही बनवून या लाभार्थ्यांच्या नावावर तत्कालीन व्यवस्थापकांनी हा कर्जाचा बोजा टाकला आहे. 
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ लातूर कार्यालयात तत्कालीन जिल्हा व्यवस्थापकांनी व त्यांच्या एका नांदेड येथील दलालाने मिळून अहमदपूर येथील बागवान मोहल्ल्यातील ६ जणांना आपण मौलाना आझाद महामंडळाकडून कर्ज उपलब्ध करून देऊ, अशी हमी दिली. कर्जासाठी लागणारे दस्तावेज घेतले. लाभार्थ्यांचे मुस्लिम समाजातील ‘छप्परबंद’ असल्याचे शपथपत्रही तयार करून ३ लाखांच्या कर्जाचा प्रस्ताव मंजूर करून घेतला.  मात्र लाभार्थ्यांच्या हातावर केवळ प्रत्येकी २५ हजार रुपये टेकविले. बाकीचे प्रत्येकी २ लाख ७५ हजार रुपये डूल केले. दरम्यान, महामंडळाच्या वसुली पथकाने १ डिसेंबर २०१६ रोजी कर्ज फेडण्यासाठी नोटीस बजावली. त्या नोटिसांमध्ये ३ लाखांचे कर्ज असल्याचे पाहून सहाही लाभार्थी चक्रावले. आम्हाला तर केवळ २५ हजार रुपयेच मिळाले आहेत. मग ३ लाख कसे? असा सवालही त्यांनी केला. त्यांनी जिल्हा कार्यालयात येऊन कर्जाबाबत सत्यता पडताळून पाहिली. त्यानंतर आपली फसवणूक झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी सध्या कार्यरत असलेल्या जिल्हा व्यवस्थापकांकडे फसवणूक झाल्याचे गाºहाणे मांडले. शिवाय, शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून फसवणूक झाल्याची तक्रार नोंदविली. 
या लाभार्थ्यांची केली फसवणूक...
अहमदपूर शहरातील बागवान मोहल्ला परिसरात राहणाºया सय्यद महेबुब सय्यद गुलामनबी, शेख मुजाहिद मोहमद खाजा, सबदखान अब्बासखान पठाण, अझर हुसेन जाकीर हुसेन, सय्यद नवीद सय्यद ईलियास बागवान, सय्यद ईरशाद सय्यद गुलाम नबीसाब या सहाजणांची फसवणूक झाली आहे.
नातेवाईक व व्यवस्थापकांकडून फसवणूक... 
आम्ही मोलमजुरी करून जगणारी माणसं आहोत. आमच्या नांदेड येथील एका पाहुण्याने तुम्हाला कर्ज मिळवून देतो, असे सांगितले. त्यामुळे लागणारे कागदपत्रे त्यांना दिली. त्यांनी केवळ २५ हजार रुपयेच आमच्या हातावर टेकविले आहेत, अशी माहिती सय्यद इर्शाद सय्यद गुलाम नबीसाब यांनी दिली. 
आम्ही सय्यद; पण ‘छप्परबंद’चे शपथपत्र बनविले...
आम्हाला मौलाना आझाद महामंडळाकडून कर्ज मिळवून देतो, असे सांगितले होते. पण आमच्या प्रस्तावात ‘छप्परबंद’ असल्याचे शपथपत्र जोडले आहे. त्याबाबत आम्हाला काहीच माहीत नसल्याचेही सय्यद इर्शाद यांनी सांगितले.

Web Title: Three lakh sanctioned 25 thousand rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.