आॅलिम्पिक तयारीसाठी तीन कोटी
By admin | Published: February 23, 2017 04:56 AM2017-02-23T04:56:46+5:302017-02-23T04:56:46+5:30
टोकियो (जपान) येथे २०२० मध्ये होणारी आॅलिम्पिक स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून, निवडण्यात
मुुंबई : टोकियो (जपान) येथे २०२० मध्ये होणारी आॅलिम्पिक स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून, निवडण्यात आलेल्या राज्यातील ६१ खेळाडूंची तयारी करून घेण्यासह त्यांना इतर सुविधा देण्यासाठी तीन कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंजूर केला.
गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आॅलिम्पिक अभियानासाठी ३ कोटी निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, हा निधी उपलब्ध करून देण्यास आज क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी मंजुरी दिली आहे. या निधीमधून आॅलिम्पिक अभियानांतर्गत स्पोर्ट्स सायन्स सेंटरचे नूतनीकरणासाठी ३८.७१ लाख, त्यामधील साहित्य दुरुस्तीकरिता ४.८१ लाख, या सेंटरमध्ये क्र ीडा वैद्यक शास्त्रातील कुशल आणि तज्ज्ञ व्यक्तींची मानधन तत्त्वावर नियुक्तीकरिता ३७.०८ लाख, जिम्नॅस्टिक साहित्याच्या खरेदीसाठी ७६.६८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. (विशेष प्रतिनिधी)