तीन मंत्र्यांच्या समितीवर मुख्यमंत्रिपदाचा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 06:54 AM2018-06-11T06:54:25+5:302018-06-11T06:54:25+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या अनुपस्थितीत आपत्कालीन परिस्थितीत निर्णय घेण्याचे अधिकार तीन मंत्र्यांच्या समितीला दिले आहेत.

three ministers committee take CM Charge | तीन मंत्र्यांच्या समितीवर मुख्यमंत्रिपदाचा भार

तीन मंत्र्यांच्या समितीवर मुख्यमंत्रिपदाचा भार

Next

- यदु जोशी
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या अनुपस्थितीत आपत्कालीन परिस्थितीत निर्णय घेण्याचे अधिकार तीन मंत्र्यांच्या समितीला दिले आहेत.
मुख्यमंत्री सध्या अमेरिका व कॅनडाच्या सात दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. यासाठी त्यांनी ही तीन मंत्र्यांची समिती नियुक्त केली. त्यात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन आहेत. या समितीला मुख्यमंत्रिपदाचे कोणतेही अधिकार दिलेले नाहीत तर केवळ काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्यावर मात करण्यासाठी निर्णय घेण्याचे लेखी अधिकार मुख्यमंत्र्यांनी या समितीला दिले. वित्तमंत्री मुनगंटीवार यांनी या वृत्तास दुजोरा दिला.
मुख्यमंत्री परदेश दौºयावर जाणार असतील वा अन्य कारणाने पदाचा कारभार प्रत्यक्ष करणे त्यांना शक्य नसेल, तर ते एखाद्या सहकारी मंत्र्याकडे मुख्यमंत्रिपदाचा प्रभारी म्हणून कारभार सोपवू शकतात. त्यासाठी तशी अधिसूचना काढावी लागते. फडणवीस यांनी असे काहीही केलेले नाही. त्यांनी तीन मंत्र्यांची समिती नेमली आहे. दिवंगत पांडुरंग फुंडकर यांच्याकडे असलेले कृषी खाते मात्र त्यांनी अधिकृतपणे चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपविले आहे.

Web Title: three ministers committee take CM Charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.