गोव्यात दुहेरी गुन्हे करणाऱ्या तीन नायजेरियन नागरिकांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 11:16 PM2017-11-12T23:16:35+5:302017-11-12T23:20:26+5:30

व्हिसा नसताना देशात अवैध रित्या वास्तव्य करणे तसेच अमली पदार्थाची विक्री करणे असे दुहेरी गुन्हे करणाऱ्या तीन नायजेरियन नागरिकांना एका आठवड्यात कळंगुट पोलिसांनी अटक केली आहे.

Three Nigerian nationals arrested for double crimes in Goa | गोव्यात दुहेरी गुन्हे करणाऱ्या तीन नायजेरियन नागरिकांना अटक

कळंगुट पोलिसांनी पकडलेले नायजेरियन नागरिक

Next
ठळक मुद्देनायजेरियन नागरिकांकडून गोव्यात वाढते गुन्हे १५ हजार रुपये किमतीचा गांजा हस्तगत

म्हापसा : व्हिसा नसताना देशात अवैध रित्या वास्तव्य करणे तसेच अमली पदार्थाची विक्री करणे असे दुहेरी गुन्हे करणाऱ्या तीन नायजेरियन नागरिकांना एका आठवड्यात कळंगुट पोलिसांनी अटक केली आहे. गोव्यात वाढत्या पर्यटकांच्या संख्येबरोबर नायजेरियन नागरिकांच्या बेकायदेशीर कृत्य करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे.


अमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी कळंगुट या किनारी भागातील पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन नायजेरीयन नागरिकांना अटक केली आहे. शनिवारी रात्री उशीरा कळंगुट पोलिसांनी ही कारवाई केली. त्यात मिकेल ओकोरो (३२) या हणजुणा भागात वास्तव्य करुन असलेल्या नायजरियन नागरिकाला तसेच कांदोळी भागात वास्तव करुन असलेल्या अडलेके खलीद (३८) या नागरिकाला अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे.


हे दोघेही संशयीत कांदोळी भागातील किनाऱ्यावर असलेल्या अ‍ॅरीश नावाच्या शॅकमध्ये अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांना पकडण्यासाठी निरीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पथके तयार करुन सापळाही रचण्यात आला.

या सापळ्यात  हे दोघेही अलगदपणे अडकले. नंतर त्यांना अटकही करण्यात आली. त्यांच्याकडून १५ हजार रुपये किमतीचा गांजा हस्तगत करण्यात आले . त्यांच्या विरोधात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

न्यायालयासमोर रिमांडसाठी उपस्थित केले असता त्यांची रवानगी १४ दिवसासाठी न्यायालयीन कोठडीत केली आहे. या कारवाई उपनिरीक्षक गिरीष पाडलोस्कर, विदेश पिळगावकर, सपना गावस तसेच हलावदार करिष्मा परुळेकर, दिनेश मोरजकर, गोविंद शिरोडकर, अमीर नाईक तसेच इतरांनी भाग घेतला.


या दोघांचीही अधिक चौकशी केली असता देशात वास्तव्य करण्यासाठी त्यांच्याजवळ योग्य कागदपत्रे नसल्याचे, योग्य पासपोर्ट व्हिसा नसल्याचेही पोलिसांना आढळून आले. त्यामुळे त्यांच्यावर अवैधरित्या वास्तव्य करण्याचा वेगळा गुन्हाही पोलिसांनी नोंद केला आहे.

उत्तर गोव्याच्या अधिक्षक चंदन चौधरी, उपअधिक्षक किरण पौडवाल यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक जिवबा दळवी या प्रकरणांचा पुढील तपास करीत आहे.

सात नोव्हेंबरला कळंगुट पोलिसांनी गांजा बाळगल्या प्रकरणी तसेच अधिकृत व्हिसा नसताना वास्तव्य करुन असलेल्या क्रिस ओबी ओव्हेरा (२८) या नायजेरियन युवकाला अटक करुन त्याच्या विरोधात गुन्हा नोंद केला होता.


अवैधरित्या वास्तव्य तसेच बेकायदेशीर व्यवसाय अशा प्रकरची प्रकरणे मागील काही वर्षापासून नायजेरियन नागरिकांकडून वाढू लागली आहेत. खास करुन युवा वर्गातील हे नागरिक शिक्षणाच्या नावाखाली येत असतात. त्यांच वास्तव्य  जास्त प्रमाणावर किनारी भागात असतो. येऊन आपला जम बसवल्यानंतर अमली पदार्था सारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे ते करीत असतात.

 

 

Web Title: Three Nigerian nationals arrested for double crimes in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.