आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा
By admin | Published: October 13, 2014 01:19 PM2014-10-13T13:19:05+5:302014-10-13T13:19:49+5:30
मौलाली चौक येथील हाजीमलंग दर्गा येथे विनापरवाना सभा घेऊन आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Next
सोलापूर : मौलाली चौक येथील हाजीमलंग दर्गा येथे विनापरवाना सभा घेऊन आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी शहर मध्यमधील काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे, माजी महिला व बालकल्याण समिती सभापती फिरदोस पटेल आणि शौकत पठाण यांच्याविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळी ७ ते १0 वा. दरम्यान ही सभा घेण्यात आली होती. सभा घेण्यापूर्वी आचारसंहिता कक्षाकडून नोटीस बजावण्यात आली होती. ती न स्वीकारता सभा घेण्यात आली. (प्रतिनिधी)