भुजबळ प्रकरणातील तीन अधिकारी निलंबित
By admin | Published: June 13, 2015 03:50 AM2015-06-13T03:50:36+5:302015-06-13T03:50:36+5:30
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत दोन मोठ्या घोटाळ्यांमध्ये आरोपी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे
यदु जोशी, मुंबई
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत दोन मोठ्या घोटाळ्यांमध्ये आरोपी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. बांधकाम खात्याच्या उच्चपदस्थ सूत्रांनी ही माहिती दिली.
निलंबित अधिकाऱ्यांमध्ये खात्यातील एक प्रभावशाली अधिकारी आणि सध्या एमएसआरडीसीचे मुख्य अभियंता असलेले अनिलकुमार गायकवाड यांचा समावेश आहे. ते लातूरचे भाजपाचे खासदार सुनील गायकवाड यांचे बंधू असून, खात्यातील एक प्रस्थ मानले जातात.
विशेष म्हणजे आतापर्यंत गुन्हे दाखल झालेल्या दोन्ही घोटाळ्यांमध्ये ते आरोपी आहेत. गायकवाड यांच्याशिवाय खात्याचे मुख्य वास्तुशास्रज्ञ बिपिन संख्ये आणि कार्यकारी अभियंता संजय सोलंकी यांचा समावेश आहे.